Share

Ashish Shelar | “जे कधी घरातून बाहेर पडले नाहीत, ते आज…”; आशिष शेलारांचा उद्धव ठाकरेंवर हल्ला

Published On: 

Ashish Shelar | मुंबई |  अवकाळी पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्यांच्या पीकांचे खूप नुकसान झाले आहे. याची पाहणी करण्याकरीता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मराठवाडा (Marathwada) दौरा केला. त्यावेळी उद्धव ठाकरेंनी सरकारवर टीका केल्या. याच पार्श्वभूमीवर भाजप (BJP) पक्षाचे नेते अशिष शेलार (Ashish Shelar) यांनी प्रत्युत्तवर दिलं आहे.

काय म्हणाले अशिष शेलार (Ashish Shelar)

ज्यांनी अडीच वर्षात शेतकऱ्यांसाठी काहीच केलं नाही. ज्यांनी अडीच वर्ष शेतकऱ्यांचे कधी अश्रू पुसले नाहीत. जे कधी घरातून बाहेर पडले नाही. ते आज आमच्यावर टीका करत आहेत, असं म्हणत अशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंवर चांगलाच हल्लाबोल केला आहे. अशिष शेलार यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.

खरं तर सत्तेत आल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारकडून शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक उपाय योजना करण्यात आल्या आहेत. परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानीनंतर शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून मदत देण्यात येत आहे. मात्र, काही लोकांच्या डोळ्यात ही मदत खूपत असल्याचंही अशिष शेलार यांनी म्हटलं आहे.

पुढे बोलताना शेलार असंही म्हणाले की, कोरोनाची दोन वर्ष वेदनादायी होती. आता नवीन सरकारने आपल्या सणांवरच्या सर्व मर्यादा काढल्या आहेत. त्यामुळे यंदा मोठ्या प्रमाणात राज्यात सांस्कृतीक कार्यक्रम साजरे करण्यात येत आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!