महाराष्ट्र देशा डेस्क: पावसाळा सुरु होताच भक्ष्य शोधण्यासाठी साप मानवीवस्तीत शिरल्याच्या घटना घडू लागतात. अशीच एक घटना कल्याण परिसरात घडली आहे. विशेष म्हणजे एक विषारी कोब्रा नाग चक्क मच्छिमाऱ्याच्या जाळ्यात सापडला होता. मच्छीमाराला हा नाग दिसताच त्याचा एकच गोंधळ उडाला. मात्र सर्पमित्रांच्या मदतीने जाळे कापून त्या नागाला जीवदान देण्यात आले आहे. कल्याण पश्चिमेकडील ग्रामीण भागात मोठमोठी गृह संकुले जंगल, शेती नष्ट करून उभारली जात आहे. त्यातच जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु असल्याने बिळातून विषारी-बिन विषारी साप मानवी वस्तीत शिरत असल्याच्या घटना गेल्या काही दिवसापासून वाढल्या आहेत.
https://youtu.be/lAGhumeeomY
कल्याण पश्चिम परिसरात गोळ्वली गावात मासेमारी करणारे कुटूंब राहत असून त्यांच्या घरासमोरच मासेमारीचे जाळे ठेवले होते. याच जाळ्यात काल रात्रीच्या सुमारास घरातील एका सदस्याला कोब्रा नाग दिसला. त्यांनी या नागाला हुसकविण्याचा प्रयत्न केला. मात्र तो आणखीच आत जाऊन बसला. त्यांनतर त्यांनी हि माहिती सर्पमित्र दत्ता बोबे आणि हितेश यांना दिली असता त्यांनी घटनास्थळी पोहचून शिताफीने या कोब्रा नागाला बाहेर काढले. त्यानंतर या कुटुंबीयांनी सुटकेचा निःश्वास सोडला. हा विषारी नाग इंडियन कोब्रा जातीचा असून साडे चार फूट लांबीचा होता. या नागाला कल्याण वन विभागाच्या अधिकाऱ्याची परवागी घेवून निर्सगाच्या सानिध्यात सोडल्याची माहिती सर्पमित्र दत्ता यांनी दिली. तर दुसरीकडे हवामानात बदल झाल्याने साप भक्ष्य व उब मिळावी म्हणून बिळातून बाहेर येऊन मानवी वस्तीत शिरत असल्याचे सर्पमित्रांचे म्हणणे असून मानवी वस्तीत साप दिसल्यास तात्काळ सर्पमित्रांना याची माहिती देण्याचे आवाहन त्यांनी नागरिकांना केले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- Neelam Gorhe : ‘जे लोक गेलेले आहेत, त्यांचा…’; नीलम गोऱ्हेंनी स्पष्टच सांगितलं
- Deepali sayed | “…त्यासाठी मला संजय राऊतांची परवानगी घ्यायची गरज नाही”- दीपाली सय्यद
- IND vs ENG : सिराज जोमात इंग्लंड कोमात! जसप्रीत बुमराहच्या जागी संघात मिळालं स्थान
- SL vs PAK : बाबर आझमने मोडला विराट कोहलीचा ‘हा’ मोठा विक्रम, बनला नंबर वन फलंदाज; वाचा!
- IND vs ENG : निर्णायक सामन्यात रोहित शर्मानं जिंकला टॉस; ‘असे’ आहेत दोन्ही संघ!


