महाराष्ट्र देशा डेस्क : बीडच्या केज तालुक्यातून वाहणाऱ्या केजडी नदीत माशांचा महापूर आला आहे. नदी पात्रातील हे लाखो जिवंत मासे पाहण्याकरिता स्थानिक नागरिक मोठी गर्दी करत आहेत. तसेच मांसाहारी लोकांची हे मासे पकडण्यासाठीही गर्दी होत आहे. या ठिकाणचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.
शेलगाव लगत वाहणाऱ्या केजडी नदीच्या पुला जवळील नदीपात्रात प्रचंड प्रमाणात जिवंत मासे दिसत आहेत. जणूकाही माशांचा महापूर आल्यासारखे एकंदरीत चित्र इथे पाहायला मिळत आहे. हे दृश्य म्हणजे नुसता जिवंत माशांचा खच, आणि हेच पाहण्यासाठी स्थानिक गर्दी करत आहेत. अवघ्या गुडघाभर पाण्यात एवढे प्रचंड मासे आणि त्याचे विलोभनीय दृश्य म्हणजे जणू काही नदीला माशांचा पूर आल्यासारखे वाटत आहे.
महत्वाच्या बातम्या :
- KL Rahul : केएल राहुल वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी करतोय कसून सराव; पाहा ‘हा’ VIDEO!
- Cobra snake | कोब्रा नाग अडकला मच्छिमाऱ्यांच्या जाळ्यात
- Neelam Gorhe : ‘जे लोक गेलेले आहेत, त्यांचा…’; नीलम गोऱ्हेंनी स्पष्टच सांगितलं
- Deepali sayed | “…त्यासाठी मला संजय राऊतांची परवानगी घ्यायची गरज नाही”- दीपाली सय्यद
- IND vs ENG : सिराज जोमात इंग्लंड कोमात! जसप्रीत बुमराहच्या जागी संघात मिळालं स्थान


