🕒 1 min read
Raju Shetti | अहमदनगर : परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे खूप नुकसान झाले आहे. तसेच राज्यात यंदाचा गळीत हंगाम 15 ऑक्टोबरपासून सुरू झाला आहे. मात्र ऊस तोडण्या अजून सुरू झाल्या नसल्याचं दिसून येतं आहे. स्वाभिमान पक्षाचे (Swabhiman Party) नेते राजू शेट्टी (Raju Shetti) अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळवून देण्यासाठी आंदोलन करत असतात. याहीवर्षी त्यांनी कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात आणि आता अहमदनगरमध्ये आंदोलन केले आहे. यादरम्यान राजू शेट्टींनी राज्य सरकराला इशारा दिला आहे.
काय म्हणाले राजू शेट्टी (Raju Shetti)
राज्यातील साखर कारखान्याचे काटे ऑनलाईन केले जावेत, सर्व साखर कारखान्याच्या काट्यांवर साखर आयुक्तांचे नियंत्रण असावे आणि यासंदर्भात अंमलबजावणी करावी या मागणीसाठी येत्या 7 तारखेला पुण्यात साखर आयुक्तालयावर भव्य मोर्चा काढणार आहे. सरकारने गांभिर्याने लक्ष दिले नाही तर 17 आणि 18 नोव्हेंबरला राज्यातील ऊस वाहतूक बंद पाडणार असल्याचा इशारा शेट्टी यांनी दिला आहे. पुढे बोलताना ते असंही म्हणाले की, साखर कारखाने काट्यामध्ये शेतकऱ्यांचा ऊस लुटतात.
राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्याच्या टाकळीमियाँ येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ऊस परीषद झाली. त्यावेळी शेट्टी यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून शिंदे-फडणवीस सरकारसह विरोधकांवरही निशाणा साधला. मागच्या वर्षी तुटलेल्या ऊसाला एफआरपी पेक्षा दोनशे रूपये जास्त दर साखर कारखानदारांनी दिले पाहिजेत. तसेच यावर्षी अहमदनगर जिल्ह्यातील कारखान्यांनी एकरकमी एफआरपी देत हंगाम संपल्यानंतर 350 रूपये द्यावेत अशी मागणी राजू शेट्टींनी ऊस परिषदेत केली आहे.
तसेच, मुकादमांकडून शेतकऱ्यांची आर्थिक लूट होत असल्याने मुकादम व्यवस्था संपवावी आणि बांधकाम मजुरांप्रमाणे महामंडळाने ऊस तोडणी मजूर पुरवावेत. मुकादम कारखाना आणि शेतकऱ्यांची देखील फसवणूक करतात यामुळे सर्वात जास्त नुकसान शेतकऱ्यांचे होत असल्याचे राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Sushma Andhare | सुषमा अंधारे यांचा गुलाबराव पाटलांना इशारा, म्हणाल्या…
- NCP | देवेंद्र फडणवीसांनी घोषणा केलेला प्रकल्प जुनाच; राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याचा गौप्यस्फोट
- Ravi Rana | बच्चू कडूंनी माफी स्वीकारल्यानंतर रवी राणांची प्रतिक्रिया, म्हणाले…
- MVA | “… तर महाराष्ट्रात पुन्हा महाविकास आघाडीचं सरकार येणार”, घटनातज्ञांच भाकीत
- Arvind Sawant | मुंबई महापालिकेच्या कॅग चौकशीवरून अरविंद सावंतांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा,म्हणाले…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
