मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज केएल राहुलने आगामी वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी (India vs West Indies) तयारी सुरू केली आहे. राहुलवर नुकतीच जर्मनीत स्पोर्ट्स हर्नियाची शस्त्रक्रिया झाली होती. आता तो पूर्णपणे तंदुरुस्त असल्याचे दिसत आहे. विंडीज दौऱ्यात मैदानात उतरण्यास राहुल सज्ज आहे. विंडीज दौऱ्यावरील एकदिवसीय मालिकेसाठी राहुलचा टी-२० संघात समावेश करण्यात आलेला नाही. एकदिवसीय मालिकेसाठी निवडण्यात आलेल्या भारतीय संघात राहुलला स्थान देण्यात आले आहे.
बीसीसीआयने नुकतीच वेस्ट इंडिज दौऱ्यातील टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली. मात्र, राहुलची निवड फिटनेसचा विचार करून करण्यात आली नाही. एकदिवसीय मालिकेसाठीही तो पूर्णपणे तंदुरुस्त झाला तरच विंडीज दौऱ्यावर जाईल. परंतू केएल राहुलचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तो नेटवर फलंदाजीचा सराव करताना दिसत आहे. हा व्हिडिओ शनिवारी (१६ जुलै) केएल राहुलच्या फॅन पेजवरून शेअर करण्यात आला. व्हिडिओमध्ये तो बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये फलंदाजीचा सराव करताना दिसला आहे.
केएल राहुल कंबरेच्या दुखापतीमुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतून बाहेर पडला होता
राहुलची दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या ५ सामन्यांच्या घरेलु टी-२० मालिकेत कर्णधार म्हणून निवड करण्यात आली होती. पण कंबरेच्या दुखापतीमुळे तो मालिका सुरू होण्यापूर्वीच संघाबाहेर होता. केएल राहुल नुकत्याच झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटीतही खेळू शकला नव्हता. याशिवाय तो इंग्लंडविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकेतही सहभागी झाला नव्हता. भारतीय संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. यानंतर भारतीय संघाला वेस्ट इंडिज दौऱ्यावर जायचे आहे. यानंतर भारतीय संघ आशिया चषकात खेळताना दिसेल.
#KLRAHUL backs to nets.Started practicing Ahead of #IndvsWI series. pic.twitter.com/JRhT8A1Ngl
— KLRAHUL TRENDS™ (@KLRahulTrends_) July 16, 2022
वेस्ट इंडिज दौऱ्याची सुरुवात वनडे सामन्याने होणार
केएल राहुलला आयपीएलच्या १५व्या हंगामात लखनऊ सुपरजायंट्सकडून खेळताना दिसला होता. राहुलची आयपीएलमधील कामगिरी उत्कृष्ट राहिली होती. आयपीएल सारख्या मोठ्या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत राहुल दुसऱ्या क्रमांकावर होता. केएल राहुलने १५ सामन्यात ५१ च्या सरासरीने ६१६ धावा केल्या होत्या. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील एकदिवसीय मालिका २२ जुलैपासून सुरू होणार आहे. तर या दोन्ही देशातील टी-२० सामने २९ जुलैपासून खेळवले जाणार आहेत.
महत्वाच्या बातम्या :
- Neelam Gorhe : ‘जे लोक गेलेले आहेत, त्यांचा…’; नीलम गोऱ्हेंनी स्पष्टच सांगितलं
- Deepali sayed | “…त्यासाठी मला संजय राऊतांची परवानगी घ्यायची गरज नाही”- दीपाली सय्यद
- IND vs ENG : सिराज जोमात इंग्लंड कोमात! जसप्रीत बुमराहच्या जागी संघात मिळालं स्थान
- SL vs PAK : बाबर आझमने मोडला विराट कोहलीचा ‘हा’ मोठा विक्रम, बनला नंबर वन फलंदाज; वाचा!
- IND vs ENG : निर्णायक सामन्यात रोहित शर्मानं जिंकला टॉस; ‘असे’ आहेत दोन्ही संघ!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

