🕒 1 min read
Ramdas kadam । मुंबई : माजी विरोधी पक्षनेते आणि मंत्री रामदास कदम यांनी शिवसेना नेतेपदाचा राजीनामा दिला आहे. रामदास कदम यांनी काही वेळापूर्वी उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानी राजीनामा पाठवला आहे. कदम हे माजी विरोधी पक्षनेते आणि माजी मंत्री आहेत. शिवसेनेच्या नेतेपदावर देखील रामदास कदम होते. दरम्यान, कदम लवकरच पक्षाचा राजीनामा देणार असल्याचं म्हटलं होतं आणि अखेर त्यांनी राजीनामा दिलाय.
याच पत्रात कदम म्हणतात, “विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी आपण मला अचानक मातोश्रीत बोलावून घेतलं आणि मला आदेश दिले की यापुढे तुमच्यावरती कुणीही कितीही टीका केली किंवा पक्षावर काही बोललं किंवा मातोश्रीवर कोण काही बोललं तरी आपण मीडियासमोर अजिबात जायचे नाही. मीडियासमोर कुठलेही वक्तव्य करायचे नाही. यामागचं कारण मला आजपर्यंत कळू शकलं नाही. मागील ३ वर्षांपासून तोंड दाबून बुक्क्यांचा मार मी सहन करीत आहे. ज्या ज्या वेळी शिवसेनेवरती संकटं आली, त्या वाईट काळामध्ये माझा संघर्ष उभ्या महाराष्ट्राने पाहिला आहे. महाराष्ट्रातला प्रत्येक शिवसैनिक याचा साक्षीदार आहे, असंही कदम यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या राजीनामा पत्रात रामदास कदम म्हणतात, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी माझी शिवसेना नेतेपदी नियुक्ती केली होती. मात्र, शिवसेना प्रमुखांचं निधन झाल्यानंतर नेते पदाला कुठलीही किंमत राहिली नाही, हे मला पाहायला मिळालं. तसेच आपण मुख्यमंत्री झाल्यानंतर आपल्या व्यस्त कार्यक्रमातून शिवसेना नेत्यांना विश्वासात घेण्याचं काम आपल्याकडून कधीच झालं नाही. उलटपक्षी मला व माझा मुलगा आमदार योगेश रामदास कदम याला अनेक वेळा अपमानित करण्यात आलं, असाही ते म्हणाले.
महत्वाच्या बातम्या :
- Rohit Pawar : ठाकरे सरकारच्या ‘त्या’ निर्णयाची स्थगिती उठवा; रोहित पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
- IND vs ENG : ऋषभ पंतने सामनावीर म्हणुन भेटलेले ‘हे’ खास बक्षीस दिलं रवी शास्त्रींना; पाहा VIDEO!
- Maharashtra Bus Accident In MP | बस अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना पन्नास लाख रुपये द्या! – अमोल मिटकरी
- Ramdas kadam : सेनेला पुन्हा धक्का, रामदास कदम यांच्याकडून शिवसेनेच्या नेतेपदाचा राजीनामा
- CM Eknath Shinde : राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; विकासकामांना स्थगिती न देण्याची मागणी

