Share

वंचित आघाडीचा तिढा सुटण्याची शक्यता, औवेसी आणि आंबेडकरांची सयुंक्त बैठक

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : वंचित आघाडीत जागा वाटपावरून तिढा निर्माण झाला आहे. मात्र यावर तोडगा काढण्यासाठी वंचित आघाडी अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आणि एमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांची पुण्यात बैठक होणार आहे. या बैठकीत वंचित आघाडीच्या जागावाटपाबाबत तोडगा निघणार असल्याची शक्यता आहे.

एमआयएमए वंचित आघाडी कडे 98 जागा मागितल्या आहेत. तर आंबेडकरांनी फक्त आठ जागांची ऑफर दिली आहे. त्यामुळे भारिप अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आणि असदुद्दीन ओवैसी यांच्यात मतभेद असल्याचं समोर आल आहे. याविषयी एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील म्हणाले, आठ जागा लढवणे म्हणजे निवडणूक न लढवण्याचा सारखे आहे. जागावाटपाबाबत ओबीसी आणि प्रकाश आंबेडकर निर्णय घेतील. आम्ही बाळासाहेब आंबेडकर यांच्या सोबत आहोत. जागेसंदर्भात औवेसी निर्णय घेतील. औवेसी यांनी सांगितल्यास आठ जागेवरही लढू असेही इम्तियाज जलील यांनी सांगितले आहे.

दरम्यान लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमची आघाडीमूळे राज्यात मोठे धक्‍के बसले आहेत.याचा सर्वाधिक फटका कॉंग्रेस-राष्ट्रवादीला बसला आहे. यात वंचित बहुजन आघाडीने 31 लाखाहून अधिक मत घेतले आहेत. यात शिवसेनचा बाल्ले किल्ला असेलेल्या औरंगाबादेत एमआयएमचा खासदार वंचित बहुजन आघाडीच्या पाठिंब्यावर निवडुन आला आहे. यासह अनेक ठिकाणी दुसऱ्या व तिसऱ्या ठिकाणी उमेदवार राहिले.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!