Share

अब्दुल सत्तार यांचा शिवसेनेत प्रवेश; उद्धव ठाकरेंनी बांधले शिवबंधन

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा: कॉंग्रेसचे माजी आमदार अब्दुल सत्तार यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत सत्तार यांनी शिवसेनेचा झेंडा हाती घेतला आहे. त्यामुळे औरंगाबादमध्ये कॉंग्रेस अजूनच कमकुवत झाली आहे.

दरम्यान, अब्दुल सत्तार भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा अनेक दिवसांपासुन सूर आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रे दरम्यान सत्तार भाजप प्रवेश करणार असल्याचं बोलले गेले. मात्र भाजपकडून त्यांना प्रतिसाद देण्यात आला नाही. त्यामुळे अखेर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.

अब्दुल सत्तार हे सिल्लोडचे माजी आमदार होते. लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसने औरंगाबादमधून उमेदवारी न दिल्याने ते नाराज होते. कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष पदासह आमदारकीचा राजीनामा त्यांनी दिला होता. आज त्यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.

दरम्यान, उस्मानाबादमध्येही कॉंग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रशांत चेडे यांच्यासह काँग्रेसच्या ३ तालुकाध्यक्ष आणि इतर अनेक पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. या सर्वांचे राजीनामे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याकडे पाठवले आहेत. राजीनाम्यानंतर हे सर्व नेते हे आता शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. त्यामुळे उस्मानाबाद जिल्ह्यातील शिवसेना आणखीच मजबूत होणार आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!