Share

कॉंग्रेसला मोठा धक्का; ‘हा’ आमदार करणार शिवसेनेत प्रवेश

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीला लागलेली गळती काही केल्या थांबायला तयार नाही. आतापर्यंत अनेक नेत्यांनी पक्षांतर केले आहे तर अनेक नेते भाजप आणि शिवसेनेच्या वाटेवर आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकांच्या दृष्टीने कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या गोटात चिंतेचे वातावरण आहे.

अशातच श्रीरामपूरमध्ये कॉंग्रेसला मोठा धक्का बसला आहे. विद्यमान आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. भाऊसाहेब कांबळे हे लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. मुंबईत ४ सप्टेंबरला उद्धव ठाकरे यांच्या उपस्थिती कांबळेंचा शिवसेनेत प्रवेश होणार आहे. त्यामुळे अहमदनगर जिल्ह्यात कॉंग्रेसला मोठा धक्का बसला आहे.

दरम्यान, भाऊसाहेब कांबळे यांना कॉंग्रेसने लोकसभा निवडणुकीत शिर्डी मतदारसंघातून उमेदवारी दिली होती. परंतु या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. शिवसेनेच्या सदाशिव लोखंडे यांनी त्यांचा पराभव केला होता. त्यानंतर आता विधानसभा निवडणुकीच्या आधी कांबळे यांनी शिवसेनेची वाट धरली आहे.

दरम्यान, यापूर्वी शिवसेनेत अनेक नेत्यांनी प्रवेश केला आहे. त्यात रश्मी बागल, दिलीप सोपल, दिलीप माने यांचा समावेश आहे. तसेच राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते छगन भुजबळही शिवसेनेच्या वाटेवर आहेत.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!