टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सातारचे माजी आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी भाजपात प्रवेश केला आहे. या पक्षांतरावरून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जोरदार टीका केली आहे. मंत्रिपदाच्या तुकड्यासाठीचं शिवेंद्रराजे भोसले यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असल्याची जहरी टीका केली आहे. शिवस्वराज्य यात्रेच्या माध्यमातून राष्ट्रवादी पक्ष विधानसभेची मोर्चेबांधणी करत आहे. शिवस्वराज्य यात्रा आज सतारला पोहचली यावेळी जयंत पाटील यांनी विरोधकांवर जोरदार टोलेबाजी केली.
यावेळी जयंत पाटील म्हणाले की, मंत्रिपदाच्या तुकड्यासाठी शिवेंद्रराजे भोसले यांनी राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. मात्र भाजपने जर राष्ट्रवादीतून आलेल्या सर्वांची निष्ठा पाहिल्याशिवाय मंत्रिमंडळ न देण्याचा फतवा काढला, तर काय करतील शिवेंद्रराजे? असा सवाल पाटील यांनी यावेळी उपस्थित केला. राष्ट्रवादी पक्षाने शिवेंद्रराजेंना कायम आपुलकीची वागणूक दिली. त्यांना काटा टोचला तरी शरद पवार साहेबांचा आपुलकीने फोन यायचा. पण आता असा आपुलकीचा फोन भाजपमधून येईल का? असा सावर त्यांनी विचारला.
दरम्यान शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा भाजप पक्ष प्रवेश हा राष्ट्रवादीसाठी मोठा धक्का होता. शिवेंद्र राजे हे राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांच्या विश्वासातले नेते होते. मात्र उदयनराजे यांचा मतदारसंघातील कामात होणारा हस्तक्षेप आणि सत्ते अभावी खुंटलेल्या विकासाचा मुद्दा पुढे करून उदयनराजे भोसले यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
- सत्तेत असताना जनतेशी संवाद साधला असता तर ही वेळ आली नसती : मुख्यमंत्री
- उदयनराजे आतून आमच्या बरोबरचं, रामदास आठवलेंचा खळबळजनक दावा
- भ्रष्टाचाराने बरबटलेले लोकचं आज भाजपमध्ये प्रवेश करत आहेत : जयंत पाटील
- दादा म्हणतात… ‘एक दोन नव्हे तर सेनेसोबत भाजपची ३०० टक्के युती होणारच’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

