टीम महाराष्ट्र देशा- पालघर जिल्ह्यातले बोईसर मतदारसंघाचे बहुजन विकास आघाडीचे आमदार विलास तरे यांनी काल आपल्या समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश केला. मुंबईत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्याचं पक्षात स्वागत केलं.
तरे यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात शिवसेनेतून झाली आहे. प्रारंभी ते सेनेचे तत्कालीन ठाणे जिल्हा परिषदेचे सदस्य होते. त्यामुळे याभागात त्यांची मजबूत पकड आहे. तरे यांच्या सेना प्रवेशाने हितेंद्र ठाकूर यांच्या साम्राज्याला मोठा हादरा बसला आहे.

यावेळी उद्धव ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना आमच्याकडे कोणतंही वॉशिंग पॉवडर नसल्याचा टोला हाणला. कुठलेही टार्गेट नाही. आमच्याकडे कोणतेही वॉशिंग पॉवडर नाही. शिवसेनेच्या कामांवर आकर्षित होऊन इतर पक्षातील मंडळी आमच्याकडे येत आहेत. त्यामुळे चांगलं काम करण्यासाठी शिवसेनेला साथ मिळत आहे, असं उद्धव म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
विधानसभेला मला शिवेंद्रराजेंचे काम करावं लागेल
आभाळाचा खांब – एकनाथ शिंदे
उस्मानाबादमध्ये राष्ट्रवादीला खिंडार, ‘हा’ बडा नेता भाजपच्या वाटेवर


