टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणूकीनंतर आता सर्वत्र विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. सर्वच पक्षांनी पक्षबांधणी, राजकीय दौरे, भेटीगाठी यांसारख्या राजकीय घडामोडींना उधाण आले आहेत. सर्वच पक्षांनी जनसंपर्क साधण्यासाठी वेगवेगळ्या यात्रांचे आयोजन केले आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपची महाजनादेश यात्रा सुरु आहे.
ही यात्रा नांदेड येथे आली असता नांदेडचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी उपस्थितांना संबोधित केले. यावेळी बोलताना ‘मी जो काही आहे, त्याची दोनच कारणं आहेत. एक तर भारतीय जनता पक्ष आणि दुसरे म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. माझ्यासारखा मीच आहे. आतापर्यंत चार पक्ष बदलून आलो. आता मला पक्ष बदलायचा नाहीये. पण मी एक धोरण घेतलंय जीना यहा मरना यहा.’असं विधान केले आहे.
पुढे बोलताना चिखलीकर यांनी देवेंद्र फडणवीस साहेब, मी जोपर्यंत जिवंत आहे. तोपर्यंत तुमचा कार्यकर्ता म्हणून या भागामध्ये काम करणार. त्या भागामध्ये तुम्हाला जो अपेक्षित भारतीय जनता पक्ष आहे. तो नांदेड जिल्हा भाजपचा बालेकिल्ला होणार, तो नारा सार्थ केल्याशिवाय राहणार नाही असं आश्वासन मुख्यमंत्र्यांना दिले.
दरम्यान, फडणवीस यांनी यावेळी बोलताना अशोक चव्हाणांवर जोरदार टीका केली. त्यांनी अशोकाचं झाड उंचच उंच वाढतं. त्याची सावली कोणाला मिळत नाही अशा शब्दात चाव्हांना लक्ष केले आहे.
- यापुढे कोणतीही निवडणूक मी लढवणार नाही, राष्ट्रवादीच्या आमदाराची घोषणा
- ‘माजोरी आणि मुजोरी केल्यामुळेच विरोधक हारले पण तरी नाही सुधरले’
- ‘जसा गुळाला मुंगळा चिकटून बसतो तशी शिवसेना सत्तेला चिकटून बसली आहे’
- शीतयुद्धाला सुरुवात : शिवसेनेची एकही जागा भाजपला सोडणार नाही
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
