Share

शीतयुद्धाला सुरुवात : शिवसेनेची एकही जागा भाजपला सोडणार नाही

Published On: 

सोलापूर : आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप स्वबळावर निवडणूक लढविण्याची तयार करीत आहे. शिवसेना देखील आपली टाकत या निवडणुकीत वाढविताना पहायला मिळत आहे. दोन्ही पक्षांमध्ये आघाडीमधील नेते फोडण्यात स्पर्धा सुरु झाली असून आता युतीमध्ये शीतयुद्धाला सुरुवात झाली आहे.

सोलापूर जिल्ह्यात शिवसेनेकडे विधानसभेच्या जितक्या जागा आहेत तितक्याच जागा राहतील, युती झाल्यास शिवसेनेची एकही जागा भाजपला सोडणार नसल्याचे जलसंधारणमंत्री तथा सोलापूरचे सहपालकमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी स्पष्ट केले आहे. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनिमित्त आलेले ना. सावंत यांनी गुरुवारी शासकीय विश्रामगृह येथे शिवसेना पदाधिकार्यांची बैठक घेतली. यावेळी ते बोलत होते.

पुढे बोलताना सावंत म्हणाले,आम्ही जिल्ह्याचा अहवाल पक्षप्रमुखांना दिला आहे. शिवसेनेने दिलेल्या लढ्याचे योगदान वाया जाऊ दिले जाणार नाही. कोणाला जागा सुटेल आणि कोणाची जागा जाणार याच्या नादाला लागू नका. गल्ली व गाव तिथे शाखा काढा. शिवसैनिकाच्या निष्ठा आणि कामावर माझा विश्वास आहे. आपल्यालाच गुलाल उधळायचा आहे. येत्या पंधरा दिवसांत युती होईल की नाही हे जाहीर होईल, असेही डॉ. सावंत म्हणाले.

दरम्यान, सोलापूर जिल्ह्यात दिलीप सोपल, रश्मी बागल, दिलीप माने यांच्यासह अनेक नेते मंडळी सेनेत दाखल झाले आहेत. या इनकमिंगमुळे सेनेची ताकत वाढली असली तरीही एक गट नाराज झाल्याची देखील चर्चा आहे. विशेषतः रश्मी बागल यांचा शिवसेना प्रवेश अनेकांना रुचलेला नाही.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!