टीम महाराष्ट्र देशा : राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय पक्ष चांगलेच सक्रीय झालेले आहेत. तसेच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक नेते पक्षांतर करताना दिसत आहेत. याच पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे.
याविषयी भाष्य करताना देवेंद्र फडणवीस यांनी स्वाभिमान पक्षाच्या विलिनीकरणाचा निर्णय शिवसेनेला विश्वासात घेतल्याशिवाय घेणार नाही, असं वक्तव्य केलं आहे. त्यामुळे नारायण राणेंच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या विलिनीकरणावर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. तसेच फडणवीसांच्या या वक्तव्यानंतर आता शिवसेना या विलिनीकरणासाठी तयार होणार का हे पाहन महत्वाचं ठरणार आहे.
दरम्यान, नारायण राणेंच्या भाजप प्रवेशावर चंद्रकांत पाटील यांनीही भाष्य केले आहे. त्यांनी ‘हा विषय माझ्या ताकदीच्या पलिकडे असल्याचं सांगत यावर बोलण्यास नकार दिला. नारायण राणे यांच्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह निर्णय घेण्यास समर्थ आहेत असं विधान केले. त्यामुळे नारायण राणेच्या प्रवेशावर चंद्रकांत पाटील नाराज तर नाहीत ना असा प्रश्न उपस्थित होत आहे.
तसेच पाटील यांनी ‘भाजप आणि शिवसेनेला फायदा होईल असाच ते निर्णय घेतील. मात्र शिवसेनेची नारायण राणे यांच्याबाबत काही नाराजी असेल तर या संदर्भात मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय अध्यक्ष हे शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करतील. उद्धव ठाकरे यांच्या ना हरकती नंतरच राणेंच्या पक्ष प्रवेशाचा निर्णय घेतला जाईल, असं विधान चंद्रकांत पाटील यांनीही केले आहे. त्यामुळे शिवेना काय भूमिका घेते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
- ‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात भावी विरोधीपक्ष नेत्याचे गुण दिसतात’
- ‘डॉ. आंबेडकर आणि संघप्रमुखांचे विचार सारखेच’ – चंद्रकांत पाटील
- मी बाळासाहेबांकडे परत गेलो असतो तर उद्धव घर सोडणार होते : नारायण राणे
- मी केस फिल्टरच्या पाण्याने धुतले म्हणून वाचलो, बबनराव लोणीकरांचा अजब दावा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
