Share

‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात भावी विरोधीपक्ष नेत्याचे गुण दिसतात’

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : सत्ताधारी भाजपला धुळीत मिळवण्यासाठी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने एकत्र येत आघाडी उभी केली आहे. तर अन्य छोट्या पक्षांनी देखील कॉंग्रेस आघाडीला दर्शवला आहे. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस आघाडी होणारचं आणि सत्ताधाऱ्यांचापर्दाफाश करणारचं असा विश्वास कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेसने पर्दाफाश यात्रेचे आयोजन केले आहे. ही यात्रा आज विदर्भात आली. यावेळी बाळासाहेब थोरात यांनी आघाडीबाबत भाष्य केले. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात भावी विरोधीपक्ष नेत्याचे गुण दिसत असल्याचा टोला लगावला आहे. यावेळी थोरात म्हणाले की, कॉंग्रेस आघाडी होणारच शिवाय वंचित आघाडीला सोबत घेण्याचे देखील प्रयत्न सुरु आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा कॉंग्रेस आघाडीचं सरकार येणार आहे.

दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेला टक्कर देण्यासाठी कॉंग्रेसचे पर्दाफाश यात्रा काढली आहे. या यात्रेच्या माध्यमातून कॉंग्रेस पक्ष जास्तीतजास्त मतदारांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करत आहेत.ही यात्रा पहिल्या टप्प्यात विदर्भातील अमरावती, वर्धा, चंद्रपुर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, यवतमाळ,वाशिम, अकोला, बुलढाणा या जिल्ह्यात विविध ठिकाणी महापर्दाफाश सभा होणार आहेत. पुढच्या टप्प्यात मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि कोकण-मुंबई या विभागात सभा होणार आहेत.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!