टीम महाराष्ट्र देशा : ‘आरक्षण दिले जावे, मात्र त्याचा आढावा ठराविक कालावधीनंतर घेतला जावा, असे विचार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी व्यक्त केले होते. सरसंघचालकांनीसुद्धा तशीच भूमिका मांडली आहे. आरक्षण रद्द करा, असे सरसंघचालक बोललेच नाहीत’, असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. नव्या आरक्षणाने खुल्या प्रवर्गावर अन्याय झाल्याचे देखील त्यांनी अमान्य केले.
दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकांसंदर्भात बोलताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष व राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेसोबत युती होणारच असा पुनरुच्चार केला आहे. एकाबाजूला भाजप राज्यात स्वबळावर निवडणूक लढविण्याची तयारी करत असल्याची दबक्या आवाजात चर्चा सुरु आहे. तर दुसऱ्या बाजूला नेते मात्र सेनेसोबत युती होणारच हे ठणकावून सांगत आहेत.
पाटील म्हणाले,दोन्ही पक्ष एका विशिष्ट वैचारिक विचारसरणीवर चालणारे आहेत. विद्यमान आमदारांच्या जागांना हात लावायचा की नाही हाच मुद्दा आहे. दोन्ही पक्षांची गणेशोत्सवात बैठक होईल. त्यात अंतिम निर्णय होईल. मात्र सेनेसोबत भाजपची ३०० टक्के युती होणारच असल्याचे पाटील यांनी सांगितले.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
