🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा :पश्चिम महाराष्ट्रातील सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात सध्या पूरस्थिती निर्माण झाली आहे. या पुरामध्ये अनेकांच्या घरात पाणी घुसले आहे त्यामुळे संसार उध्वस्त झालेले आहेत. तसेच अनेक लोक अद्यापही पुरात अडकलेले आहेत. पुरात अडकलेल्या लोकांच्या सुटकेसाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.
पुरात नुकसान झालेल्या कुटुंबांसाठी तसेच त्यांचे संसार पूर्ववत व्हावे यासाठी राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट करून मदतीसाठी भावनिक साद घातली आहे. त्यांनी ‘बहिणींना माहेरच्या आधाराची गरज आहे, चला सगळे मिळून संसार उभा करूया’ अशा शब्दात त्यांना मदतीचे आवाहन केले आहे.
#कोल्हापूर #सांगली
बहिणींना माहेरच्या आधाराची गरज आहे
चला सगळे मिळून संसार उभा करूया
संघर्ष
Ac No.006115000008512IFSC:TBSB0000006
संपर्क.9930000002
25346969संघर्ष
Ac No.006115000008512IFSC:TBSB0000006
25348282
25386565
25386464#retweet pic.twitter.com/2HQJASDnju— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) August 9, 2019
त्याचबरोबर त्यांनी एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्यात त्यांनी कोल्हापूर आणि सांगलीच्या लोकांसाठी जी शक्य होईल ती मदत करण्याचे आवाहन केले आहे. यात ज्यांचे संसार वाहून गेले आहेत त्यांच्यासाठी भानी आणि इतर संसारासाठी लागणाऱ्या गोष्टी देण्याचे आवाहन केले आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसने देखील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी हात पुढे केला आहे, पक्षाचे सर्व लोकप्रतिनिधी मिळून ५० लाख रुपयांची मदत पूरग्रस्तांना करणार असल्याची घोषणा पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. तर शासकीय यंत्रणाही पूरग्रस्तांच्या मदतीसाठी अपार कष्ट घेत आहेत.
उस्मानाबादमध्ये राष्ट्रवादीला खिंडार, ‘हा’ बडा नेता भाजपच्या वाटेवर
भाजप २५० जागा जिंकणार, मग बाकीच्या जागांमध्ये आम्ही गोट्या खेळायच्या का ?’
शिवसेनेचे ते 4 नेते पडले नाही, त्यांना पाडण्यात आलं : राज ठाकरे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

