Share

शिवसेनेचे ते 4 नेते पडले नाही, त्यांना पाडण्यात आलं : राज ठाकरे

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकीत देशात आणि राज्यात भाजप पक्षाला घवघवीत यश मिळालं होत. या यशात शिवसेनेन देखील हातभार लावला होता. राज्यात भाजप – सेना युती होती. त्यामुळे या युतीने राज्यात सर्वाधिक जागा जिंकल्या होत्या. काही मतदार संघांमध्ये मात्र युतीला धक्कादायक निकालाला सामोरे जावे लागले होते. खासकरून शिवसेनेला हा धक्का होता. कारण शिवसेनेच्या वरिष्ठ आणि अनुभवी नेत्यांना या लोकसभा निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला. विशेष म्हणजे हे चारही नेते मंत्रीपदाचे दावेदार होते. मात्र हे नेते लोकसभा निवडणुकीतचं बाजूला पडले.

यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपला टोला लगावला आहे. महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकांच्या वेळेस शिवसेनेचे काही खासदार त्यांनी मंत्री म्हणून नको होते नेमके तेच लोकं पाडले गेले. अमरावतीमध्ये आनंदराव अडसुळ पडले, शिरुरमध्ये शिवाजी आढळराव पाटील, रायगड अनंत गीते पडले तसेच औरंगाबादमध्ये चंद्रकांत खैरे पडले असा दावा राज ठाकरेंनी केला आहे. त्यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा हा टोला खोचक असला तरी त्यात काही बाबी तथ्य असल्याची चर्चा आहे.

शिरूर मतदारसंघात ३ वेळा खासदार झालेले शिवसेनेचे शिवाजीराव आढळराव पाटील यांना राष्ट्रवादीचे नव उमेदवार खा. डॉ. अमोल कोल्हे यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला. तर औरंगाबादमध्ये शिवसेनेचे मातब्बर नेते चंद्रकांत खैरे यांना देखील एमआयएम चे खा. इम्तियाज जलील यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला. हे दोन पराभव शिवसेनेला जिव्हारी लागले. तर आनंद गीते आणि आनंदराव अडसुळ यांचा पराभव देखील तसा अनपेक्षित होता. मात्र या धक्क्यातून शिवसेनेने स्वतःला सावरत पुन्हा विधानसभेसाठी भाजप बरोबर मोर्चेबांधणी केली आहे. अशातच आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी युतीच्या राजकारणातील कट कारस्थानाचा नवीन मुद्दा उपस्थित केला आहे.

 

‘यांना माहिती आहे सत्ता यांचीचं येणार , त्यामुळे भाजप नेत्यांना माज आलाय !’

 

सत्ताधारी नेत्यांना फिरायला हेलीकॉप्टर मिळत पण बचाव कार्यासाठी मिळत नाही’

 

पाकिस्तानसारखा शेजारी कोणत्याही देशाच्या वाट्याला येऊ नये : राजनाथ सिंग

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!