🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा :राज्यात आता विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. सर्वच पक्षांनी पक्षबांधणी, राजकीय दौरे, भेटीगाठी यांसारख्या राजकीय घडामोडींना उधाण आले आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनी मुंबईत आज कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन केले होते.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या मेळाव्यात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला. त्यांनी ‘भाजपचे लोक प्रत्येक निवडणुकीत त्यांच्या किती जागा निवडून येतील, याचा आकडा सांगतात. यांना इतका आत्मविश्वास येतो कुठून? आताही भाजपचं कोणीतरी म्हणालं आहे की आमच्या २५० जागा निवडून येतील. भाजपच्या इतक्या जागा निवडून येणार तर आम्ही काय उरलेल्या जागांवर गोट्या खेळायच्या का ?’ अशा शब्दात भाजपवर टीका केली आहे.
पुढे बोलताना त्यांनी नरेंद्र मोदी यांच्यावरही जोरदार टीका केली. माहिती अधिकार कायद्यावर बोलताना ठाकरे यांनी ‘मोदी यांना B.A. पास की नापास विचारलं म्हणून माहिती अधिकार कायदाच बदलला’ अशी टीका त्यांनी मोदी सरकारवर केली. तसेच माहिती आयुक्तांचा कार्यकाळ, त्यांचा पगार सरकारने ठरवायचा’ , असा कायदा पारित करून घेतला अस ठाकरे म्हणाले.
दरम्यान , लोकसभा निवडणुकीतही राज ठाकरे यांनी वारंवार मोदी सरकारला लक्ष केले होते. त्यांनी एकही उमेदवार न उभा करता निवडणुकीच्या प्रचारात सहभाग नोंदवला होता आणि आताही ठाकरे यांनी माहिती अधिकार कायद्यावरून मोदींना लक्ष केले आहे.
खुशखबर : ९वी, १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी अंतर्गत मूल्यमापनाचे कायम
‘माहितीच्या अधिकाराखाली शिक्षण विचारलं तर मोदींनी कायदाचं बदलला’
बचावकार्यासाठी एनडीआरएफच्या पूरग्रस्त भागात २८ टीम कार्यरत – सुभाष देशमुख
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

