Share

‘मावळमध्ये पराभव होऊ शकतो तर बारामतीत अवघड नाही’

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकीत मावळ मतदारसंघात राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांचा दारूण पराभव झाला होता. त्यामुळे पवार घराण्याला पराभवाचे तोंड पाहावे लागले होते. यावरूनच आता विरोधकांचे मनोबल वाढले असून आता पुढचे टार्गेट म्हणून बारामतीत पवारांचा पराभव करण्याची रणनीती विरोधक आखताना दिसत आहेत.

मावळ प्रमाणेच बारामतीत देखील पवार यांचा पराभव होऊ शकतो, कार्यकर्त्यांनी यासाठी जोमाने काम करावे , असे आवाहन भारतीय जनता पक्षाचे नवनिर्वाचित पुणे जिल्हा अध्यक्ष गणेश भेगडे यांनी केले. बारामती शहरात भाजप कार्यकर्त्यांच्या बैठकीत गणेश भेगडे बोलत होते.

याप्रसंगी बोलताना गणेश भेगडे यांनी बारामती शहर व तालुक्यांमध्ये भारतीय जनता पक्षाची संघटना मजबूत करावी, बूथ यंत्रणा सक्षम करून अधिकाधिक मतदारांपर्यंत कार्यकर्त्यांनी पोहोचावे असे सांगितले. पवारांना त्यांच्या बालेकिल्ल्यातच पराभूत करणे अवघड नाही , त्यासाठी कार्यकर्त्यांनी एकीने प्रयत्न करावेत असे आवाहन केले.

दरम्यान, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने कांचन कुल यांना सुप्रिया सुळे यांच्या विरोधात मैदानात उतरवले होते. परंतु त्यांना सुप्रिया सुळे यांनी पराभूत केले. तसेच २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत महायुतीकडून महादेव जानकर यांना उमेदवारी मिळाली होती परंतु त्यांचाही सुळे यांनी पराभव केला होता.

महत्वाच्या बातम्या 

कॉंग्रेसची चिंता वाढली, ‘हा’ दिग्गज नेता निवडणुकीतून माघार घेण्याच्या तयारीत

वंचितच्या नेत्यांनी आघाडीबाबत समंजस भूमिका घ्यावी : अजित पवार

‘खासदारकीचा तुकडा मिळण्यासाठी राजू शेट्टींनी अभद्र युती केली’

भाजप-सेना युती होणारच नाही , जयंत पाटलांची भविष्यवाणी

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!