Share

कॉंग्रेसची चिंता वाढली, ‘हा’ दिग्गज नेता निवडणुकीतून माघार घेण्याच्या तयारीत

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणूकीनंतर आता सर्वत्र विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. सर्वच पक्षांनी पक्षबांधणी, राजकीय दौरे, भेटीगाठी यांसारख्या राजकीय घडामोडींना उधाण आले आहेत. अशातच अशोक चव्हाण यांनी २०१९ ची विधानसभा निवडणूक लढवन्यास इच्छुक नसल्याचे म्हटले आहे.

लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवामुळे कॉंग्रेस खचून गेली आहे. तसेच विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेसमधील काही नेत्यांनी पक्षांतर केले आहे. अस असतानाच माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हेही विधानसभा निवडणूक लढवन्यास इच्छुक नसल्याने कॉंग्रेससाठी हा धक्का आहे.

सध्या कॉंग्रेसमध्ये इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरु आहे. यानंतर माध्यमांशी बोलताना चव्हाण यांनी सांगितले की, निवडणूक लढवण्यासाठीची पक्षाची प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. तसेच स्वतः पक्षाकडे उमेदवारी मागितली देखील नाही. परंतु पक्षाने आदेश दिला तर निवडणूक लढवेन हे देखील त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीतही अशोक चव्हाण निवडणूक लढवण्यासाठी उत्सुक नव्हते. परंतु त्यांनी पक्षश्रेष्ठींच्या आदेशावरून निवडणूक लढवली होती. त्यात त्यांचा पराभव झाला होता. आताही ते निवडणूक लढवण्यास उत्सुक नाहीत. त्यामुळे येणाऱ्या काळात ते काय भूमिका घेतात हे पाहन महत्वाच ठरणार आहे.

‘लोकसभा आणि विधानसभांमध्येही महिलांसाठी राखीव जागांची तरतूद करण्याची गरज’

आघाडीला खिंडार : ‘या’ बड्या नेत्याने बांधले हाती शिवबंधन

‘असते एक-एकाचे नशीब… कधी डक वर्थ लुईस मदतीला येतो तर कधी ईव्हीएम’

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!