Share

वंचितच्या नेत्यांनी आघाडीबाबत समंजस भूमिका घ्यावी : अजित पवार

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेस आघाडीला प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित आघाडीमुळे मोठा फटका सहन करावा लागला होता. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस आघडी ने वंचित आघाडीला सोबत घेण्याचा विचार केला आहे. मात्र वंचित आघडीकडून कॉंग्रेस सोबत जाण्याबाबत अद्याप कोणतीही सकारात्मक चर्चा झाली नाही. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांनी समंजस भूमिका घ्यावी, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.

सोलापूर येथे आज राष्ट्रवादीतील इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. यावेळी अजित पवार यांनी इच्छुक उमेदवारांशी चर्चा केली. तर पत्रकारांशी देखील संवाद साधला. यावेळी अजित पवार म्हणाले की, वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांनी आघाडीबाबत काहीही वक्तव्य केले असले तरी आम्ही ते दुखावतील असे उत्तर देणार नाही. पण समविचारी पक्षांनी एकत्र यावे, असा आमचा प्रयत्न राहणार आहे. लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीमुळे मतविभाजन झाले, अन्यथा सोलापूरचा निकाल वेगळा असता.

दरम्यान लोकसभा निवडणुकीत वंचित आघाडी हा गेम चेंजर पक्ष ठरला आहे. आणि याचा फटका कॉंग्रेस आघाडीला बसला होता. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत सावध पाऊल उचलत कॉंग्रेस आघाडीने वंचितला सोबत घेण्यचा निर्णय घेतला आहे. मात्र वंचित आघाडी ही कॉंग्रेस सोबत जाण्यास फारशी उत्सुक नाही.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!