Share

भाजप-सेना युती होणारच नाही , जयंत पाटलांची भविष्यवाणी

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : भाजप-शिवसेना ज्या पध्दतीने इतर पक्षातील लोकांना पक्षात सामावूत घेत आहे, ते पाहता आगामी विधानसभा निवडणूक हे दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे लढतील, यात तिळमात्र शंका नसल्याचं मत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केलं आहे.

सध्या भाजप-शिवसेनेकडून मोठ्या प्रमाणात इनकमिंग केले जात आहे. या दोन्ही पक्षांना सत्तेवर येण्याची खात्री नसल्यानेच ते इतर पक्षातील लोकांना घेत आहेत. मात्र पक्षांतर करणारे व करुन घेणारे यांना जनता कंटाळली आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत दोन्ही पक्षांना जनताच जागा दाखवेल असे सांगून राज्यात सत्तांतर अटळ असल्याचाही दावा जयंत पाटील यांनी केला आहे.

दरम्यान, जागा वाटपाबाबत घटक पक्षांशी चर्चा सुरु आहे. युतीला पराभूत करण्यासाठी जे पक्ष एकवटले आहे त्यांची मोट बांधण्यात येत आहे. पुढील दहा दिवसात म्हणजेच 15 ऑगस्टपूर्वी जागा वाटप निश्चित केले जाईल. यामध्ये कोणती अडचण येणार नाही. दर मंगळवारी व बुधवारी मुंबई येथे कॉंगेस-राष्ट्रवादीची जागा वाटपाबाबत बैठक होत असते. निम्म्याहून अधिक जागांचा निर्णय झाला आहे. उर्वरीत जागांबाबतही लवकरच निर्णय होणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या 

आघाडीची पुणे लोकसभा जागा ‘कॉंग्रेसच’ लढवणार

मुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवारांना एकाचं बॅनरवर आणत ‘या’ नेत्याने दिल्या अनोख्या शुभेच्छा

स्वबळावर लढलो तर १७० जागा येतील – चंद्रकांत पाटील

मुस्लिम खाटीक समाजाच्या मागण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन लवकरच मार्ग काढू : राम शिंदे

भाजपने आपलं चिन्ह बदलून ‘कमळावर घड्याळ आणि हात’ असं ठेवावं

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!