Share

‘खासदारकीचा तुकडा मिळण्यासाठी राजू शेट्टींनी अभद्र युती केली’

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत. या पार्श्वभूमीवर नेत्यांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. यादरम्यान अनेक नेते एकमेकांवर टीका करताना दिसत आहेत. अशातच सदाभाऊ खोत यांनी राजू शेट्टी यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

रयत क्रांती संघटनेचे संस्थापक सदाभाऊ खोत यांनी ‘खासदारकीचा तुकडा मिळण्यासाठी राजू शेट्टींनी अभद्र युती केली. हातकणंगले लोकसभा मतदारसंघ त्यांच्या ताब्यात राहिला नाही. बिनीचे सरदारही त्यांच्यापासून दुरावले आहेत. आता शेतकऱ्यांच्या प्रश्नावर ते आक्रोश करणार असल्याचे सांगत आहेत, वास्तविक, आक्रोश करायला त्यांच्या पक्षात ते एकटेच उरले आहेत अशा शब्दात शेट्टी यांच्यावर निशाना साधला आहे.

आघाडी सरकार १५ वर्षे सत्तेवर होते. त्या सरकारसोबत शेतकरी संघटनेने अखंडपणे संघर्ष केला. दूध, ऊस, कापूस, सोयाबीन या उत्पादनांना हमीभाव देण्याची मागणी करणाºया शेतकऱ्यांना तेव्हा गोळ्या घालण्यात आल्या. अनेक शेतकरी मरण पावले. संघटनेचे नेतृत्व करणाऱ्या राजू शेट्टींनी मात्र राजकारणात आपले भवितव्य टिकून राहावे, यासाठी प्रस्थापितांसोबत अभद्र युती केली असंही खोत म्हणाले.

दरम्यान, पुढे बोलताना ‘अकरा प्रश्नांचं उत्तर मिळविण्यासाठी ते आता आक्रोश यात्रा काढणार आहेत. शेतकरी कार्यकर्ते त्यांच्यासोबत राहिलेले नाहीत, आता त्यांच्या प्रश्नाला उत्तर द्यायला आम्ही बांधील नाही. त्यांच्या एकट्याचाच आक्रोश सुरू आहे. नटसम्राट नाटकासारखी ‘खासदारकी देता का खासदारकी’ अशी त्यांची अवस्था झाली असल्याचंही सदाभाऊ खोत म्हणाले.

धनंजय मुंडेंची मोर्चेबांधणीला सुरुवात ; पत्नी राजश्री मुंडे प्रचाराच्या मैदानात

मुख्यमंत्रीपदावरून सदाभाऊ खोतांचा उद्धव ठाकरेंना टोला

भाजपच्या ‘या’ महिला नेत्याला फोडत राष्ट्रवादीने दिले भाजपला प्रत्युत्तर

मनसे विधानसभा निवडणूक लढवणार का ? सोमवारी मिळणार ठाकरी शैलीत उत्तर

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!