टीम महाराष्ट्र देशा : ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी कॉंग्रेसला मोठा दणका बसणार आहे. नवी मुंबईतील राष्ट्रवादीचे माजी मंत्री आणि माजी आ. गणेश नाईक ५२ नगरसेवकांसह भाजपात प्रवेश करणार आहेत. गेले अनेक दिवस नवी मुंबईच्या नगरसेवकांचा एक गट भाजपमध्ये प्रवेश कानार असल्याची चर्चा होती. मात्र आज महापौरांच्या उपस्थितीत अंतिम निर्णय घेण्यात आला.

नवी मुंबई येथे ५२ नगरसेवकांच्या गटाने भाजप प्रवेशाबाबत बैठक बोलावली होती. महापौर जयवंत सुतार यांनी ही बैठक बोलावली असून महापौर बंगल्यावर दुपारी ही बैठक पार पाडली. या बैठकीत बुधवारी पक्षांतर करण्याचा निर्णय नक्की झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश होणार आहे.
दरम्यान काही दिवसांपासून नवी मुंबईचे अनेक नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करू इच्छित होते. मात्र गणेश नाईक हे राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्येचं राहण्याच्या निर्णयावर ठाम होते. त्यामुळे आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या 57 नगरसेवकांची बैठक बोलावली होती. या बैठकीत गणेश नाईक यांच्यावर भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी दबाव टाकण्यात येणार होता. खुद्द नवी मुंबईचे महापौर देखील या बैठकीत सहभागी होते. त्यामुळे आता नगरसेवकांच्या दबावानंतर पवारांचे जवळचे नेते मानले जाणरे गणेश नाईक देखील भाजपात प्रवेश करणार आहेत.
विधानसभेच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेची बैठक, सर्व संपर्क प्रमुख उपस्थित
राष्ट्रवादीची पुण्यात महत्वपूर्ण बैठक, शरद पवारांनी घेतला विधानसभा मतदार संघांचा आढावा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

