Share

विधानसभेच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेची बैठक, सर्व संपर्क प्रमुख उपस्थित

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेची बैठक आज पार पडली, राज्यातील शिवसेनेचे सर्व संपर्क प्रमुख या बैठकीत उपस्थित होते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेना भवनात ही बैठक पार पडली.

लोकसभा निवडणूक नुकतीच पार पडली, लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला दणदणीत विजय मिळाला आहे. आता आगामी विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. सर्व पक्षांनी मोर्चे बांधणीला सुरवात केली आहे.

याचदरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या २८८ विधानसभा मतदार संघातील संपर्क प्रमुखांच्या बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीच्या मुद्यावरून पदाधिकाऱ्यांसोबत बराच वेळ चर्चा झाली. शिवसेनेच्या या बैठकीत नेमकी चर्चा काय झाली हे अद्यापही समोर आले नाही.

 

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!