टीम महाराष्ट्र देशा : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसची पुण्यात आज ( २२ जुलै ) महत्वपूर्ण बैठक पार पडली. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली असून राज्यातील सर्व विधानसभा मतदार संघांचा आढावा या बैठकीत घेण्यात आला.
आगामी विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. सर्व पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. दरम्यान राष्ट्रवादी सर्वेसर्वा शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादीची पुण्यात आज महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते छगन भुजबळ, खासदार सुनील तटकरे, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, दिलीप वळसे पाटील, आदी निते उपस्थित होते. शरद पवार यांनी या बैठकीत राज्यातील सर्व विधानसभा मतदार संघांचा आढावा घेतला.
नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेस- राष्ट्रवादी आघाडीला पराभव स्वीकारावा लागला आहे. आघाडीला केवळ ६ जागांवर विजय मिळाला आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागू नये म्हणून राष्ट्रवादी कॉंग्रेसने मोर्चेबांधणीला सुरवात केली आहे.
आगामी विधानसभा निवडणुकांबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष खासदार @PawarSpeaks यांच्या प्रमुख उपस्थितीत पुण्यात एक महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली. पवार साहेबांनी या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या राज्यभरातील मतदारसंघांचा आढावा घेतला. @MumbaiNCP #Meeting #pune pic.twitter.com/tXb096GB99
— Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar (@NCPspeaks) July 22, 2019
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

