Share

Thackeray-Ambedkar | ठाकरे गट आणि वंचितच्या युतीवर आज होणार निर्णय? आजच्या बैठकीकडे सर्वांचं लक्ष

Published On: 

🕒 1 min read

Thackeray-Ambedkar | मुंबई : काही वेळापूर्वीच प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यात बैठक होणार नसल्याचीही माहिती समोर आली होती. मात्र त्यानंतर अवघ्या काही मिनिटांच्या फरकाने पुन्हा एकदा या दोन्ही नेत्यांमध्ये बैठक सुरु असल्याचं वृत्त समोर आलं. महाराष्ट्रात पुन्हा भीमशक्ती आणि शिवशक्ती राजकीय पटलावर एकत्र येते का?, या पार्श्वभूमीवर या बैठकीला विशेष म्हत्त्व प्राप्त झालं आहे.

उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांच्यामधील बैठकीकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे. ही भेट आज ग्रॅन्ड हयात हॉटेलमध्ये सुरु असल्याची माहिती समोर आली. त्यानंतर राजकीय घडामोडींनी वेग आल्याचं पाहायला मिळालं.

या बैठकीला मिलिंद नार्वेकर यांच्यासोबत विनायक राऊत हे देखील उपस्थित असल्याचं कळतंय. सध्या सुरु असलेल्या बैठकीत महायुतीबाबत काय निर्णय होतो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

दरम्यान, रविवारी संध्याकाळी उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांच्यामध्ये बैठक होणार असल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर सोमवारी सकाळपासून उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांच्या आज होणाऱ्या बैठकीकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. प्रबोधनकार डॉट कॉम या संकेतस्थळाच्या कार्यक्रमात उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर हे एकाच मंचावर आले होते. त्यावेळी आंबेडकर आणि ठाकरे एकत्र येण्याच्या राजकीय चर्चांना उधाण आलं होतं.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now

🕘 संबंधित बातम्या