Share

Ashish Shelar | “वा रे मर्दा…! राष्ट्रवादीसोबतचा संसार सर्वात मोठा नेभळटपणा नाही काय?”; आशिष शेलार यांचा पलटवार 

Published On: 

Ashish Shelar | मुंबई: कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या सीमा भागातील गावांवर मोठा वाद निर्माण झाला आहे. तर दुसरीकडे, भाजप नेत्यांकडून शिवरायांबद्दल बेताल वक्तव्य सुरूच आहे. याच मुद्यावरून शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाच्या अग्रलेखातून शिंदे सरकारवर टीका करण्यात आली आहे. ‘भाजपच्या आशिष शेलारांनी तोलून मापून सांगितले की, ‘‘कर्नाटकने ‘अरे’ केल्यास ‘कारे’ने उत्तर देऊ.’’ भाजपचे हे ढोंग आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री आजही एका सुरात हे ठणकावून बोलायला तयार नाहीत की, ‘‘बेळगाव कारवारसह संपूर्ण सीमाभाग महाराष्ट्राचाच! आणि तो पुन्हा महाराष्ट्रात आणल्याशिवाय गप्प बसणार नाही.’’ शिंदे-फडणवीस यांनी एकदा तरी ही गर्जना केली काय? तिकडे कानडी मुख्यमंत्री सीमाभागासाठी लढतात, महाराष्ट्राच्या गावांवरही दावा ठोकतात व महाराष्ट्र सरकारचे शेलारमामा नेभळटासारखे फक्त ‘अरे’ ला ‘कारे’ बोलू असे बोलतात”, अशी टीका सामनाच्या अग्रलेखातून आशिष शेलार (Ashish Shelar) यांच्यावर करण्यात आली. यावर प्रत्युत्तर देत शेलार यांनी एक पत्रक काढून शिवसेनेला चांगलंच सुनावलं आहे.

नेमकं काय म्हणालेत आशिष शेलार?

विरोधी पक्षाने नरसिंह होऊन खोके सरकारचा अंत करायला हवा, अशी “मर्दानी” हाक आज सामनाच्या अग्रलेखातून दिली आणि “कर्नाटकने आरे केले तर आम्ही कारे करु” हा महाराष्ट्राने दिलेला इशारा यांनी नेभळट ठरवला… वा रे मर्दा..!

मुळात विरोधी पक्षाने नरसिंह अवतार धारण करण्यासाठी, या अवताराला बोलावण्यासाठी एका “प्रामाणिक” भक्त प्रल्हादाची गरज असते ना हो कार्यकारी संपादक महोदय…! तुमच्याकडे नारायण..नारायण जप करणारा भक्त प्रल्हाद आहे का? तुमच्याकडे आता भक्तप्रल्हाद ही नाही, नारायण ही नाही. आणि हो, तुमच्यात आता रामच उरलेला नाही. आठवते का? कधी काळी राम मंदिर आणि राम वर्गणीची खिल्ली उडवली होतीस ना रे मर्दा? आता भक्तप्रल्हाद होऊ पाहताय? वा रे मर्दा!

कर्नाटकला महाराष्ट्र जशास तसे उत्तर देईल… आरेला कारे करेल… हा इशारा तुम्हाला नेभळट वाटतो काय? मग राहुल गांधी आणि त्यांची काँग्रेस स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकररांना समलैंगिक म्हणते तेव्हा तुम्ही करता तो काय? मर्दानी बाणा असतो काय? वा रे मर्दा वा!

तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वशंजाकडे पुरावे मागता, तो काय तुमचा मर्दपणा होता का?प्रभू राम झालाच नाही… भगवत गीता जिहाद शिकवते असे महान जावई शोध लावणाऱ्या काँग्रेस सोबत इलूइलू जे तुमचे सुरु आहे, ती मर्दानगी आहे का? अहो महाराष्ट्रातील श्रध्दा वालकर नावाच्या लेकीचे 35 तुकडे केले जातात तेव्हा जो पक्ष साधी हळहळ सुध्दा व्यक्त करीत नाही ना, त्याला नेभळटपणा म्हणतात…
देशाचे तुकडे करायला निघालेल्या पीएफआयवर आमच्या सरकारने बंदी घातल्यानंतर त्याचे साधे समर्थन ही न करणे हे नेभळटपणाचे लक्षण नाही का? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वातंत्र्य लढ्यात योगदान काय? हा प्रश्न विचारणे म्हणजे तुम्हाला मर्दानगी वाटते काय? वा रे मर्दा..!

वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना जे अभिवादन करायला तयार नाहीत, अशा काँग्रेस, राष्ट्रवादी सोबत तडजोडीचा संसार हाच सगळ्यात मोठा नेभळटपणा नाही का?

काश्मीर मधून 370 हटवणे, अयोध्येत राम मंदिर बांधणे ही मर्दानी कामे आहेत संपादक महोदय…आम्हाला, होय… होय आम्ही मर्द आहोत..असे होर्डिंग लावावे लागत नाही… भाजपाने करुन दाखवलंय… मनगटात ज्यांच्या जोर असतो तेच मर्दानगी करु शकतात. उरला प्रश्न वंदनीय शेलारमामांचा…अहो तुमचे फुसके कर्तृत्व सिध्द करायला तुम्ही काय करताय? छत्रपती शिवाजी महाराज यांचे निष्ठावंत पराक्रमी मावळे अशी ओळख असलेल्या शेलारमांमाना तुम्ही नेभळट म्हणताय की काय?
वा रे मर्दा!

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!