🕒 1 min read
Prakash Ambedkar | मुंबई : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्यात भेटीची आज चर्चा होत आहे. सत्तेतून पायऊतार झाल्यानंतर उद्धव ठाकरे गट राजकीय समीकरण बळकट करण्यात व्यस्त आहेत. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्या वंचित बहुजन आघाडीशी उद्धव ठाकरे युती करणार असल्याची चर्चा आहे. बीएमसी निवडणुकीत प्रकाश आंबेडकर शिवसेना एकत्र लढणार असल्याची चित्रे आहेत. अशा स्थितीत ही युती भाजप-एकनाथ शिंदे यांना पराभूत करू शकणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान यावर प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
प्रकाश आंबेडकर म्हणाले, “पक्षाची भूमिका आम्ही जाहीर केली आहे. शिवसेनेला आम्ही कळवले आहे की युती करायला आम्ही तयार आहोत. माध्यमांना सांगायचे आहे की काही गोष्टी जाहीर करायच्या असतील तर आम्ही जाहीर करु. त्यामुळे अफवांवर विश्वास ठेऊ नका.”
मुंबई महापालिका निवडणुका तोंडावर आल्या आहेत. उद्धव ठाकरे शिवसेनेला पुन्हा जिवंत करण्याचा प्रयत्न करत आहेत. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने खासदार, आमदार, शिवसैनिक उद्धव ठाकरेंची साथ सोडून गेले आहेत. अशा स्थितीत उद्धव ठाकरेंना राजकीय बळ देणाऱ्या साथीदाराची गरज आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे प्रकाश आंबेडकर यांच्याशी हातमिळवणी करण्याची चर्चा आहे. प्रकाश आंबेडकर यांनी युतीसाठी हिरवा झेंडा दाखवला आहे.
महत्वाच्या बातम्या :
- IND vs BAN | पंतला संघातून बाहेर काढण्याबाबत के.एल. राहुलने केला मोठा खुलासा, म्हणाला…
- Sanjay Raut | “हिंमत असेल तर बोम्मईंना…”; सीमाप्रश्नावरून संजय राऊतांचं भाजपला आव्हान
- Raosaheb Danve | छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख, रावराहेब दानवेंकडून स्पष्टीकरण! मागितली माफी
- Sanjay Raut | “राजभवनाची बिस्कीटं न खाता, राज्यपालांना ‘कारे’ करून दाखवा”; संजय राऊतांचं भाजपाला आव्हान
- KVS Recruitment | केंद्रीय विद्यालयामध्ये 13,000 हून अधिक जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
