रविवारी भारत आणि बांगलादेश (IND vs BAN) यांच्यामधील तीन एकदिवसीय मालिकेचा पहिला सामना पार पडला. या सामन्यामध्ये बांगलादेशने भारताचा 1 गडी राखून पराभव केला. या सामन्यांमध्ये भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करत फक्त 186 धावा केल्या. तर, भारताच्या युवा गोलंदाजांनी बांगलादेशचे नऊ बळी मिळेपर्यंत दमदार कामगिरी केली. या सामन्यांमध्ये टीम इंडियाला शेवटच्या विकेटसाठी खूप मेहनत घ्यावी लागली. पण भारतीय संघाला शेवटची विकेट घेण्यात यश मिळाले नाही.
बांगलादेश दौऱ्यावर भारतीय संघात थोडे बदल बघायला मिळाले आहे. यामध्ये प्लेइंग इलेव्हन मध्ये के एल राहुल (KL Rahul) ला आयत्यावेळी घेण्यात आले आहे. तर ऋषभ पंत (Rishabh Pant) संघातून बाहेर पडला आहे. अशा परिस्थितीमध्ये के ल राहुलला रिषभ पंतबाबत विचारलेल्या प्रश्नांचे त्याने अगदी रोखठोकपणे उत्तर दिले आहे.
के एल राहुल म्हणाला की,”या आधी सुद्धा मी चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर फलंदाजी केलेली आहे. मला टीमकडून जे सांगितलं जातं ते करण्यासाठी मी नेहमी तयार असतो.” पुढे पंतबाबत बोलताना राहुल म्हणाला की,”पंत सध्या खेळत नाही हे मला ड्रेसिंग रूममध्ये समजलं होत. मला त्याच्याबद्दल काहीच माहित नव्हतं. इतरांना विचारल्यावर कळालं की त्याला का काढून टाकलं. त्याला काढून टाकण्यामागे कदाचित एखाद वैद्यकीय कारण असू शकतं.”
यावेळी के एल राहुल पुढे म्हणाला की,”बांगलादेश संघाने नाणेफेक जिंकल्यानंतर ड्रेसिंग रूममध्ये संघातील सदस्यांना विकेटकीपर नसल्याची माहिती मिळाली. दरम्यान, बीसीसीआयकडून जारी करण्यात आलेल्या पत्रकानुसार पंतला एकही कारण न देता किंवा योग्य स्पष्टीकरण न देता टीम मधून काढण्यात आले आहे. पंतला संघातून का काढले याबद्दल कोणत्याही खेळाडूला फारशी कल्पना नाही. त्याचबरोबर आम्ही देखील यामध्ये जास्त लक्ष देत नाही कारण आम्हाला खेळावर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे.
बांगलादेश विरुद्धच्या झालेल्या या सामन्यांमध्ये केल राहुलने उत्कृष्ट फलंदाजी केली. यामध्ये त्यांनी 70 चेंडू मध्ये 73 धावा केल्या. दरम्यान, फलंदाजी करून सुद्धा के ल राहुलच टीमच्या पराभवासाठी एक महत्त्वाचे कारण ठरला. कारण काल झालेल्या सामन्यांमध्ये राहुलने महत्वाचे झेल सोडले.
महत्वाच्या बातम्या
- Sanjay Raut | “हिंमत असेल तर बोम्मईंना…”; सीमाप्रश्नावरून संजय राऊतांचं भाजपला आव्हान
- Raosaheb Danve | छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख, रावराहेब दानवेंकडून स्पष्टीकरण! मागितली माफी
- Sanjay Raut | “राजभवनाची बिस्कीटं न खाता, राज्यपालांना ‘कारे’ करून दाखवा”; संजय राऊतांचं भाजपाला आव्हान
- KVS Recruitment | केंद्रीय विद्यालयामध्ये 13,000 हून अधिक जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू
- Amol Mitkari | भाजपवाल्यांनी शिवरायांच्या अपमानाची सुपारी घेतली ; अमोल मिटकरी यांचा आरोप
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

