Share

Uddhav Thackeray | “महाराष्ट्राचे 2 मंत्री कर्नाटक सरकारच्या सुरक्षेसाठी काम करतात”; ठाकरे गटाचा निशाणा कुणावर?

Published On: 

Uddhav Thackeray | कोल्हापूर : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं आहे. एकीकडे ठाकरे विरुद्ध शिंदे गटात आरोप प्रत्यारोपाची मालिका सुरु आहे तर दुसरीकडे सत्ताधारी विरुद्ध विरोधीपक्ष असा संघर्ष पाहायला मिळतोय. त्यातच भर म्हणजे महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरून अस्थिरता निर्माण झाली आहे. अशातच उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटातील नेते विजय देवणे (Vijay Devne) यांनी भाजपवर सडकून टीका केली आहे.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावर समन्वय साधण्यासाठी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) तसेच उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) हे शनिवारी बेळगावात जाणार होते. मात्र कायदा व सुव्यवस्थेचे कारण दाखवत कर्नाटक सरकारने या मंत्र्यांनी बेळगावात येऊ नये, असे सांगितले. यावर विजय दवणे म्हणाले, कर्नाटक महाराष्ट्र सीमाप्रश्न सोडवण्यासाठी महाराष्ट्र सरकार अपयशी ठरत आहे. तसेच महाराष्ट्राचे 2 मंत्री कर्नाटक सरकारच्या सुरक्षेसाठीच काम करतायत.

“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हस्तक्षेप करून या दोन मंत्र्यांना बेळगावात जाण्यापासून रोखलंय”, अशी टीका कोल्हापूरचे ठाकरे गटाचे नेते विजय देवणे यांनी केली आहे. पुढे ते म्हणाले, शंभूराजे देसाई हा बनावट मंत्री आहे. तो फक्त मोठ्याने बोलतो. व्हिडिओ कॉन्फरन्स वरच बोलतो.

चंद्रकांत पाटील आणि शंभूराजे देसाई मध्ये एवढा दम नाही की ते कर्नाटकचं कडं भेदून बेळगावमध्ये जातील. सीमा भागातील मराठी माणसांची चाड असेल आणि कर्नाटक सरकारचं कडं भेदून जाणं शक्य नसेल तर गनिमी काव्याने जायला हवं होतं. पण त्यांनी तसं केलं नाही, अशी टीका देवणे यांनी केली.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!