Share

Ajit Pawar | अजित पवार पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर, सत्तारांच्या वक्तव्यावर बाळगलं होतं मौन

Published On: 

🕒 1 min read

Ajit Pawar | पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसते नेते व राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार (Opposition leader Ajit Pawar) हे पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. मावळमधील विविध कार्यक्रमांना अजित पवार (Ajit Pawar) यांनी हजेरी लावली. शिंदे गटातील नेते, कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांना शिवीगाळ केली होती. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (Nationalist Congress Party) आक्रमक झाला होता. सर्व नेते सत्तारांवर टीका करत होते. मात्र यावेळी अजित पवार गप्प होते. त्यामुळे अजित पवार नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. राष्ट्रवादीच्या शिर्डी येथील मेळाव्यानंतर ते नॉट रीचेबल होते. दरम्यान अजित पवार पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर असल्याची माहिती समोर आली आहे.

अजित पवार कधी कोणती भूमिका घेतील याबद्दल काही नेम नाही –

“अजित पवार यांनी सुप्रिया सुळे यांची बाजू का घेतली नाही. याबद्दल चर्चा सुरु आहे. पण मला वाटते तो भाऊ-बहीणीचा प्रश्न आहे. मात्र अजित पवार कधी कोणती भूमिका घेतील याबद्दल काही नेम नसतो. त्यांच्या भुमिकेचा अंदाज व्यक्त करता येत नाही,”  असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

दया कुछ तो गडबड है-

मनसे नेते गजानन काळे म्हणाले, “महाराष्ट्रासमोर इतके प्रश्न आ वासून उभे आहेत. मात्र महाराष्ट्रातील शॉडो मुख्यमंत्री ज्यांना म्हटले जाते ते विरोधी पक्ष नेते अजित  पवार काही दिवसापासून शांत असल्याचे आपण बघितले. इतकं की राष्ट्रवादीच्या मंथन शिबिरात तब्येत बरी नसताना शरद पवार उपस्थिती लावतात. मात्र काही वयक्तिक कारण सांगून अजित पवार हे अनुपस्थित होते. दया कुछ तो गडबड है,  एवढे मात्र नक्की”, असे गजानन काळे म्हणाले.

“काल परवा अब्दुल सत्तार सारखा एक मंत्री सुप्रिया सुळे यांच्यावर इतक्या गलिच्छ भाषेत, शिवराळ भाषेत बोलतो. संपूर्ण महाराष्ट्रातून त्याचा निषेध केला जातो. मात्र विरोधी पक्ष नेत्याच्या ट्विटर अकाउंटवर सुध्दा याची साधी प्रतिक्रिया दिसत नाही. कुठल्या मीडियाला सुध्दा अजित पवार यांनी निषेध नोंदवला आहे, हे दिसत नाही”, अशी प्रतिक्रिया गजानन काळे यांनी दिली.

यापूर्वी दिल्लीत झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीतून अजित पवार निघून गेले होते. त्यामुळे ते नाराज असल्याची जोरदार चर्चा होती. वक्ता म्हणून जयंत पाटील यांच्या नावाची घोषणा होताच अजित पवार मंचावरून निघून गेले होते. नाराजी नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते मात्र यापूर्वी अजित पवारांनी बंडखोर वृत्ती दाखवली आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!