🕒 1 min read
Bhaskar Jadhav । मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात अनेक नेत्यांकडून आक्षेपार्ह विधानं केलं जात आहेत. कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याची चर्चा सुरू असतानाच मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांचा ‘नटी’ असा उल्लेख केला. यामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं आहे. विरोधकांकडून अब्दुल सत्तार आणि गुलाबराव पाटील यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. यावर ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी भाष्य करत भाजपला सुनावलं आहे.
भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) म्हणाले, “आपण अडीच-तीन वर्ष भाजपा नेते, सहयोगी सदस्य कशी वक्तव्य करत आहेत हे जरा तपासून पाहायला हवं.” भाजपाच्या अनेक नेत्यांनी केलेली वक्तव्य अत्यंत आक्षेपार्ह आहेत. त्यात आता भाजपाच्या बाजूला शिंदेंचा गट जाऊन बसला असल्याचं म्हणत त्यांनी शिंदे गटावर निशाणा साधला.
पुढे ते म्हणाले, गुलाबराव पाटील, अब्दुल सत्तार यांच्यावर उद्धव ठाकरेंच्या सुसंस्कृतपणाचा धाक होता. तो आता राहिलेला नाही. भाजपा कधीकधी आपले विचार दुसऱ्याच्या तोंडून वदवून घ्यायचा प्रयत्न करत असते. म्हणून वाण नाही, पण गुण लागला आहे. शब्द जरी त्यांचे असले, तरी भाजपाचेच शब्दप्रयोग ते करत आहेत”, अशा शब्दात भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी अब्दुल सत्तार आणि गुलाबराव पाटील यांचा समाचार घेतलाय.
दरम्यान, उद्धव ठाकरेंच्या पाठिशी उभ्या असणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर सुडबुद्धीने सत्ताधाऱ्यांकडून कारवाई केली जात असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी बोलताना केला. यावर भाजपकडून काय उत्तर येतंय हे पाहावं लागणार आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Atul Bhatkhalkar | “कटुता वाढण्याला सर्वस्वी जबाबदार शिवसेना आणि…”; अतुल भातखळकरांचे आरोप
- T20 World Cup | भारताचा पराभव होताचं शोएब अख्तर म्हणाला, “नाबाद 170… हा आकडा पुढील बराच काळ…”
- Sudhir Mungantivar | “जगदंबा तलवार महाराष्ट्रामध्ये आणण्यासाठी प्रयत्न करणार”; सुधीर मुनगंटीवार यांची मोठी घोषणा
- Yashomati Thakur | संजय राऊत धमक असलेला माणूस- यशोमती ठाकूर
- Sharad Ponkshe | ब्रिगेड नावाची घाणेरडी जमात ; शरद पोंक्षे यांची जहरी टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
