🕒 1 min read
MNS | मुंबई : शिवसेनेच्या आक्रमक नेत्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) या संजय राऊतांच्या जामीनानंतर भावुक झालेल्या पाहायला मिळाल्या. आपली प्रतिक्रिया देताना, संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यामुळे आम्हाला दहा हत्तींचं बळ मिळतं, असं सुषमा अंधारे म्हणाल्या. याबाबत टाईगर इज बॅक असं फेसबुक पोस्ट देखील अंधारेंनी केलं. यापुढे बोलताना सुषमा अंधारे यांना गहिवरुन आलं होतं. त्यांचे डोळे आनंदाश्रूंनी पाणावले होते. यावरून मनसेचे प्रवक्ते गजानन काळे यांनी ट्विट करत सुषमा अंधारे यांना डिवचलं आहे.
गजानन काळे यांनी ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यावर निशाणा साधला आहे. सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांचा ‘राजकारणातील अलका कुबल’ असा उल्लेख काळे यांनी केलाय. “सूर बदले हैं जनामब के..राजकारणातील अलका कुबल यांना हे पाहून पुन्हा अंधारात अश्रू अनावर होतील. लवंडे जोमात. मातोश्री कोमात”, अशा आशयाचं ट्विट गजानन काळे यांनी केलंय.
कालचा पिंजऱ्यातला वाघ आज मांजरीप्रमाणे बोलत होता …
सूर बदले बदले हैं जनाब के …
राजकारणातील अलका कुबल यांना हे पाहून पुन्हा अंधारात अश्रू अनावर होतील …
लवंडे जोमात,मातोश्री कोमात …— Gajanan Kale (@MeGajananKale) November 10, 2022
दरम्यान, आदित्य ठाकरे यांनी ‘संजय राऊत नॉट आऊट’ म्हणत आगामी काळात संजय राऊत पुन्हा आक्रमक होण्याचे संकेत दिले आहेत. यावर मनसेचे प्रवक्ते गजानन काळे (Gajanan Kale) यांनी ट्विट करत संजय राऊत यांना टोला लगावला आहे. काल पिंजऱ्यातला वाघ आज मांजरीप्रमाणे बोलत असल्याचं म्हणत त्यांनी संजय राऊत यांना चिमटा काढला आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Atul Bhatkhalkar | “कटुता वाढण्याला सर्वस्वी जबाबदार शिवसेना आणि…”; अतुल भातखळकरांचे आरोप
- T20 World Cup | भारताचा पराभव होताचं शोएब अख्तर म्हणाला, “नाबाद 170… हा आकडा पुढील बराच काळ…”
- Sudhir Mungantivar | “जगदंबा तलवार महाराष्ट्रामध्ये आणण्यासाठी प्रयत्न करणार”; सुधीर मुनगंटीवार यांची मोठी घोषणा
- Yashomati Thakur | संजय राऊत धमक असलेला माणूस- यशोमती ठाकूर
- Sharad Ponkshe | ब्रिगेड नावाची घाणेरडी जमात ; शरद पोंक्षे यांची जहरी टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
