🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा: टी 20 विश्वचषक (T20 World Cup) स्पर्धेमध्ये आज दुसरा उपांत्य फेरी सामना (Semi Final) भारत (India) आणि इंग्लंड (England) या संघांमध्ये पार पडला. यामध्ये इंग्लंड संघाने भारतीय संघावर मोठा विजय मिळवला आहे. उपांत्य फेरीमध्ये इंग्लंडने 10 गडी राखून भारतावर विजय मिळवत अंतिम फेरीमध्ये प्रवेश मिळवला आहे. भारतीय संघातील विराट कोहली आणि हार्दिक पांड्या वगळल्यास भारतातील संघातील सर्व फलंदाज या सामन्यांमध्ये अपयशी ठरले आहे. आज झालेल्या या सामन्यानंतर 13 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या अंतिम फेरीमध्ये इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान हा अंतिम सामना होणार आहे.
टी 20 विश्वचषक स्पर्धेमध्ये आज झालेल्या दुसऱ्या उपांत्य फेरीमध्ये इंग्लंड संघाने भारतीय संघावर 10 गडी राखून विजय मिळवला आहे. या सामन्यानंतर भारतीय संघाच्या कामगिरीवर अनेक लोक प्रतिक्रिया देत आहे. दरम्यान, पाकिस्तान संघाचा माजी क्रिकेटपटू शोयब अख्तर याने भारतीय संघावर सामन्यानंतर खोचक पद्धतीने टीका केली आहे.
आज झालेल्या या उपांत्य फेरी सामन्यांमध्ये इंग्लंड संघातील जॉस बटलर याने 80 नाबाद, तर ॲलेक्स हेक्स याने 86 नाबाद धावा केल्या. इंग्लंडने या दोन सलामीवीरांच्या जोरावर हा सामना जिंकला आहे. दरम्यान, भारतीय गोलंदाजाला इंग्लंड संघाचा एकही गडी बाद करता आला नाही. त्यामुळे अनेकांकडून भारतीय संघांवर टीका केल्या जात आहे. तर दुसरीकडे पाकिस्तान संघाचा माजी क्रिकेटर शोएब अख्तर ने देखील एक खोचक ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये त्याने एक इमोजी वापरला असून भावांनो एकही विकेट घेणार नाही का? असा प्रश्न त्याने विचारला आहे.
Bhaiyo aik bhi out nahi kero gay kya?
????— Shoaib Akhtar (@shoaib100mph) November 10, 2022
170/0
A figure thats going to disturb for times to come. Tough game India.— Shoaib Akhtar (@shoaib100mph) November 10, 2022
हा सामना संपल्यानंतर देखील शोएब अख्तरने एक ट्विट केलं आहे. त्यामध्ये तो म्हणाला आहे, “बिना बाद 170… हा आकडा पुढील बराच काळ भारतीय संघाला त्रास देत राहणार आहे. सामना भारतीय संघासाठी खूप कठीण ठरला आहे.”
महत्वाच्या बातम्या
- Yashomati Thakur | संजय राऊत धमक असलेला माणूस- यशोमती ठाकूर
- Sharad Ponkshe | ब्रिगेड नावाची घाणेरडी जमात ; शरद पोंक्षे यांची जहरी टीका
- T20 World Cup | विराटने मोडला तेंडुलकर आणि लाराचा विक्रम, ‘ही’ कामगिरी करणारा ठरला जगातील पहिला क्रिकेटर
- Sanjay Raut | मी पक्षाला आई मानतो, तिच्याशी गद्दारी करणार नाही – संजय राऊत
- Gajanan Kale । “अफजलखानाचे उद्दात्तीकरण करणाऱ्यांवरही बुलडोजर…”; मनसे नेत्याचं वादग्रस्त विधान
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
