Share

Sudhir Mungantivar | “जगदंबा तलवार महाराष्ट्रामध्ये आणण्यासाठी प्रयत्न करणार”; सुधीर मुनगंटीवार यांची मोठी घोषणा

Published On: 

🕒 1 min read

Sudhir Mungantivar | मुंबई : महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक धोरण २०१० साली सांस्कृतिक कार्य विभागामार्फत तयार करण्यात आले आहे. या सांस्कृतिक धोरणाचा फेरआढावा घेण्यासाठी एक समिती नुकतीच तयार करण्यात आली आहे. या समितीच्या कार्याध्यक्षपदी डॉ. विनय सहस्रबुद्धे यांची नियुक्ती करण्यात आली असल्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantivar) यांनी सांगितले. यावेळी बोलताना त्यांनी एक आनंदाची बातमी देखील दिली आहे.

सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantivar) म्हणाले की, जगदंबा तलवार महाराष्ट्रात परत यावी यासाठी केंद्र सरकारकडे आम्ही पाठपुरावा करत आहोत. ऋषी सुनक ब्रिटनचे पंतप्रधान झाल्यानंतर आता केंद्र सरकारच्या माध्यमातून जगदंब तलवार परत आणण्यासाठी प्रयत्न केले जातील.

पुढे ते म्हणाले, “शिवराज्याभिषेकाला 2024 मध्ये 350 वर्षे पूर्ण होतील. त्यासाठी राज्याच्या सांस्कृतिक विभागाच्या माध्यमातून आम्ही एक आराखडा तयार करत असून यावेळी जर जगदंबा तलवार भारतात परत आली तर आमचा आनंद द्विगुणित होईल.”

साधारणपणे 1875 ते 1876 च्या दरम्यान ही तलवार महाराष्ट्रातून ब्रिटनला गेली. त्यावेळचे प्रिन्स भारत दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांना काही भेटवस्तू देण्यात आल्या होत्या. त्यामध्ये जगदंबा तलवारीची समावेश होता. शिवरायांच्या पराक्रमाची साक्षीदार असलेली ही जगदंबा तलवार जर महाराष्ट्रात परत आली तर ती सर्वांसाठी आनंदाची गोष्ट असणार आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!