🕒 1 min read
Kishori Pednekar | मुंबई : एकनाथ शिंदे यांनी ५० आमदारांना घेऊन बंड केला आणि उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरुन पायउतार व्हावं लागलं. यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री बनले खरं विरोधकांनी शिंदे गटाने ५० खोके घेतल्याचा आरोप केला. यावरुन सत्ताधारकांना अनेक वेळा सुनावण्यात आल्याने संतप्त एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाने आरोप कोर्टात सिद्ध करण्याचं आव्हान दिलं आहे. त्यालाच मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी उत्तर दिलंय.
विधानसभेत जेव्हा मोठ्या प्रमाणात बोंबाबोंब झाली. आरोपांच्या फैरी झडू लागल्या. त्यावेळेला शंभूराज देसाईंनी सांगितलं हो मिळाले, तुम्हाला हवेत का, असं विचारल्यानंतर पुष्टी मिळते, पुष्टी मिळाल्यामुळे लोकं म्हणत असतील, असा घणाघात किशोरी पेडणेकर यांनी केला आहे.
आमदार-खासदार भेटत असतील. उद्धव ठाकरे यांनी तर 19 जूनलाच सांगितलंय, ज्यांना जायचंय त्यांनी जा, आईचं दूध विकू नका.. याचा अर्थ आताही कुणी जाणार असतील कुणी थांबवणार नाही, असा खोचक टोला देखील पेडणेकरांनी लगावला.
महत्वाच्या बातम्या :
- Sanjay Raut | ” राऊतांच्या जामिनाला स्थगिती द्या, मोठी नावं गुतली आहेत”; ईडीची कोर्टात मागणी
- Bharat Jodo Yatra | महाविकास आघाडीचे ‘हे’ बडे नेते होणार भारत जोडो यात्रेत सहभागी, कोण अन् कधी जाणून घ्या
- Deepali Sayyed | “पक्ष तोडांने कसा फोडतात, याचं उदाहरण…”; दीपाली सय्यद यांचा संजय राऊतांवर निशाणा
- Sanjay Raut | मोठी बातमी! संजय राऊतांचा जामीन अर्ज अखेर मंजूर
- Deepali Sayyed | अखेर दिपाली सय्यद यांचा शिंदे गटात प्रवेश, म्हणाल्या…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
