🕒 1 min read
Sanjay Raut | मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी पार पडली. कथित पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी गेल्या तीन महिन्यांपासून तुरुंगात असलेले संजय राऊत यांना अखेर जामीन मंजूर झाला आहे. विशेष म्हणजे प्रविण राऊत (Pravin Raut) आणि संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या जामीनावर एकाच दिवशी सुनावणी पार पडली.
संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यासह त्यांचे सहकारी प्रवीण राऊत यांनाही जामीन मंजूर करण्यात आला आहे. दरम्यान ईडीने संजय राऊत यांच्या जामिनाला विरोध केला आहे. ईडीने या निर्णयाला स्थगिती देण्याची मागणी केली आहे. याप्रकरणी तीन वाजता निर्णय दिला जाणार आहे. आपल्याला दाद मागण्यासाठी वेळ द्यावा अशी मागणी ईडीने (enforcement directorate) केली.
तसेच “हे लहान प्रकरण नाही. अनेक मोठी नावे यात गुंतलेली आहेत. त्यामुळे निकालाला स्थगिती द्यावी आणि निकालाला आव्हान देण्याची संधी द्यावी”, असं ईडीच्या वतीने सांगण्यात आलं आहे.
प्रत्येक तपास यंत्रणेला उच्च अथवा सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याचा अधिकार आहे. आम्हाला ठराविक वेळ द्यावा असे नाही, पण आम्हाला उच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी आदेशाला स्थगिती द्यावी,’ अशी मागणी ईडीने केली.
महत्वाच्या बातम्या :
- Deepali Sayyed | “पक्ष तोडांने कसा फोडतात, याचं उदाहरण…”; दीपाली सय्यद यांचा संजय राऊतांवर निशाणा
- Sanjay Raut | मोठी बातमी! संजय राऊतांचा जामीन अर्ज अखेर मंजूर
- Deepali Sayyed | अखेर दिपाली सय्यद यांचा शिंदे गटात प्रवेश, म्हणाल्या…
- Chitra Wagh | “…त्यामुळे अजित पवार सुप्रिया सुळे शिवीगाळ प्रकरणावर बोलले नाहीत” ; चित्रा वाघ यांचा खुलासा
- Sunil Raut On Sanjay Raut : संजय राऊतांना जामीन मिळणार? सुनिल राऊत म्हणाले…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
