Share

Bharat Jodo Yatra | महाविकास आघाडीचे ‘हे’ बडे नेते होणार भारत जोडो यात्रेत सहभागी, कोण अन् कधी जाणून घ्या

Published On: 

🕒 1 min read

Bharat Jodo Yatra | मुंबई : काँग्रेस (Congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या भारत जोडो (Bharat Jodo) यात्रेने देशातील अनेकांची मनं जिंकली. ही यात्रा कर्नाटक भागात झाली होती. त्यानंतर महाराष्ट्रातील अनेक जण या यात्रेची वाट बघत असतानाच ही यात्रा आता महाराष्ट्रात सुरु आहे. मात्र, मोठा प्रश्न उपस्थित होतोय तो म्हणजे या यात्रेत राष्ट्रवादी (NCP) पक्षाचे शरद पवार (Sharad Pawar) आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांसारखे ज्येष्ठ नेते यामध्ये सहभागी होणार का.

काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी महाविकास आघाडीचे कोणते नेते भारत जोडोमध्ये सहभागी होणार आहेत, याची माहिती दिली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, आमदार जितेंद्र आव्हाड आदी उद्या भारत जोडो यात्रेत सहभागी होणार असल्याचे अशोक चव्हाण म्हणाले. तसेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि युवासेनेचे नेते आदित्य ठाकरे हे ११ नोव्हेंबरला म्हणजे शुक्रवारी या यात्रेत सहभागी होणार आहेत, असे ते म्हणाले.

राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा महाराष्ट्रातील टप्पा सोमवारी देगलूर येथून सुरू झाला होता. या यात्रेतील भारतयात्रींमध्ये विविध राज्यातल्या काँग्रेस कार्यकर्त्यांचा समावेश आहे. भारत जोडो यात्रेचा साडेतीन हजार किलोमीटर अंतराचा कन्याकुमारी ते जम्मू काश्मीर पर्यंतचा प्रवास आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!