Share

Deepali Sayyed | “पक्ष तोडांने कसा फोडतात, याचं उदाहरण…”; दीपाली सय्यद यांचा संजय राऊतांवर निशाणा

Published On: 

🕒 1 min read

Deepali Sayyed | मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यामध्ये शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झालं. या सगळ्यामुळे शिवसेना पक्ष संपूर्णपणे कोलमडून गेला. त्याचबरोबर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याकडे आता केवळ हातावर मोजता येतील इतकेच नेते राहिले आहेत. त्यामध्ये दिपाली सय्यद देखील ठाकरे गटात नाराज असल्याचं बोललं जात होतं. या चर्चांना पूर्णविराम देत दीपाली सय्यद (Deepali Sayyed) यांनी शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. हे सांगतानाच त्यांनी संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर निशाणा साधला आहे.

त्या म्हणाल्या, “संजय राऊत हे पक्षफुटीसाठी जबाबदार आहेत. संजय राऊत यांना त्यांच्या पापाची शिक्षा झाली आहे. पक्ष तोंडाने कसा फोडला जातो, याचं उत्तम उदाहरण संजय राऊत आहेत.” संजय राऊत यांच्यामुळे शिवसेनेत दोन गट पडले असल्याचंही दीपाली सय्यद (Deepali Sayyed) यावेळी बोलताना म्हणाल्या.

तसेच, एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आपल्याला शिवसेनेत आणलं होतं. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्याबरोबर उभे राहणं कर्तव्य आहे,” असे दीपाली सय्यद (Deepali Sayyed) यांनी स्पष्ट केलं. पुढे त्या म्हणाल्या, नीलम गोऱ्हे, सुषमा अंधारे हे चिल्लर आहेत. खोक्यामागील  सूत्रधार रश्मी ठाकरे असल्याचा आरोप त्यांनी केला. मुंबई महानगरपालिकेमधून येणारे खोके वेळेवर मातोश्रीवर पोहचत नाहीत. याची खंत रश्मी वहिनींना जाणवत असल्याचे दीपाली सय्यद यांनी म्हटले.

दरम्यान, दीपाली सय्यद आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावर पोहचल्या होत्या. त्यापूर्वी प्रसारमाध्यमांशी बोलताना दीपाली सय्यद यांनी आपण शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचं जाहीर केलं. मुख्यमंत्री देतील ती जबाबदारी आपण स्वीकारणार, असेही सय्यद यांनी म्हटलं.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!