🕒 1 min read
मुंबई : पंकजा मुंडे हे महाराष्ट्राच्या राजकारणातील प्रसिद्ध नाव आहे. यासोबतच त्या अनेकदा मराठी मनोरंजन वाहिन्यांवर दिसल्या आहेत. पंकजा मुंडे यांनी बॉलिवूडचा सुपरस्टार अक्षय कुमार बद्दल एक ट्विट केले आहे. यावर अक्षय कुमारने उत्तर दिले आहे. अक्षयने केवळ उत्तरच दिले नाही तर पंकजा मुंडे यांचे आभारही मानले आहेत. पंकजा मुंडे आणि अक्षय कुमार यांच्यातील या संवादाची महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातच नाही तर मराठी आणि हिंदी मनोरंजन विश्वातही जोरदार चर्चा आहे.
पंकजा मुंडे ट्वीटमध्ये म्हणाल्या, “आज रक्षा बंधन मी आणि माझ्या बहिणी यांनी मुलांच्या समवेत ? रक्षा बंधन सिनेमा पाहीला. मला खूप भावला. समाजात अजूनही मुली व त्यांचे विवाह कठीण आहेत. कारण त्यांना किंमत मोजावी लागते. फ्रिज, टीव्ही, गाडी, या गोष्टींसाठी आपल्या लाडकीचे प्राण ही गमवावे लागतात किती दुर्दैवी आहे हे!”
मला वाटते #RakshaBandhan सिनेमात संकल्प घेतला तसा आपण घेऊ शकलो पाहिजे.कठीणआहे,आपणच दडपणात चुकीच्या रीति पाळतो.नाते फायदा-तोटा यात बसवत असतो.जरूर आपण ही परिवाराच्या सोबत हा सिनेमा पहावा,काहीतरी सुरुवात करावी नव्या दिशा नव्या निश्चयाची !good movie great message @akshaykumar sir
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) August 11, 2022
“मला वाटते रक्षा बंधन सिनेमात संकल्प घेतला तसा आपण घेऊ शकलो पाहिजे. कठीण आहे, आपणच दडपणात चुकीच्या रीति पाळतो. नाते फायदा-तोटा यात बसवत असतो. जरूर आपण ही परिवाराच्या सोबत हा सिनेमा पहावा, काहीतरी सुरुवात करावी नव्या दिशा नव्या निश्चयाची!”, असे पंकजा मुंडे म्हणाल्या.
अक्षय कुमारचे प्रत्युत्तर –
त्याला प्रत्युत्तर देताना अभिनेता अक्षय कुमारने पंकजा मुंडे यांचे आभार मानले आहेत. या सिनेमाद्वारे आपण समाजात 5 टक्केही बदल घडवून आणू शकलो तर ते आपल्यासाठी खूप मोठं यश असेल असं अक्षय कुमारने म्हटलं आहे.
Thank you Pankaja ji,
जरी आम्ही या चित्रपटाद्वारे 5% बदल घडवून आणू शकलो तरीही हा आमच्यासाठी मोठा विजय असेल.— Akshay Kumar (@akshaykumar) August 12, 2022
महत्वाच्या बातम्या :
- Ambadas danve | गद्दारांना धडा शिकवण्यासाठी मविआने एकत्र येण्याची गरज – अंबासाहेब दानवे
- Sudhir Mungantiwar | पंकजा मुंडे यांच्या नाराजीवर सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया!
- Amrita Fadnavis | अमृता फडणवीस यांच्यावर अश्लील कमेंट करणाऱ्या तरुणाला पुण्यात अटक!
- Sudhir Mungantiwar | ‘शिंदे गट’ न म्हणता ‘शिवसेना’ म्हणा – सुधीर मुनगंटीवार
- Deepak Kesarkar | रक्ताचा वारसा केवळ राजकीय असता कामा नये ; केसरकरांचा आदित्य ठाकरेंना टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
