🕒 1 min read
नागपूर : शिवसेनेत फूट पडल्यानंतर नुकतेच महाराष्ट्रात सत्तापरिवर्तन झाले आहे. बंडखोर आमदारांचे नेतृत्व करणारे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले. त्यातच आता राज्यात मंत्रिमंडळ विस्तारही झाला आहे. ज्यामध्ये शिंदे गटातील ९ आणि भाजपमधील ९ अशा एकूण १८ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र भाजप नेत्या आणि माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांचा मंत्रिमंडळात समावेश न झाल्याने त्या नाराज असल्याच्या चर्चा सुरु आहेत. त्यावर आज कॅबिनेट मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
“पंकजा मुंडे यांच्या नाराजीबद्दल मला माहित नाही. पण त्या भाजपच्या जेष्ठ नेत्या आहेत. त्यामुळे या विषयावर मी स्वतः त्यांच्याशी बोलेल. कारण भाजपच्या विस्तारासाठी त्यांचं काय मोठं आहे. याची जाण चंद्रकांत पाटील, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पक्षाच्या प्रत्येकच कार्यकर्त्याला आहे आणि त्यांचं योगदान पक्षासाठी अत्यंत महत्वाचं आहे.”, असं मत सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केलं. तसेच यावेळी त्यांनी अपक्ष आमदार बच्चू कडू यांच्या नाराजीवरही भाष्य केलं. ते म्हणाले कि, “बच्चू कडू यांनी सरकारबद्दल नकारात्मक भावना व्यक्त केली आहे ती ठीक आहे. कारण त्यांची अपेक्षा होती. ती पूर्ण झालेली नाही. मात्र मुख्यमंत्री शिंदे त्यांनी व्यक्त केलेल्या इच्छेचा भविष्यात विचार करतील.”
केसरकारांचं मोठं विधान
पंकजा मुंडे यांच्या नाराजीवर दीपक केसरकर यांनी भाष्य केलं. “पंकजा मुंडे यांच्यापुढे मोठं भविष्य, वय आहे, त्यांना काम करत राहावं लागेलं. त्यांनी थोडी सबुरी पाळली पाहिजे, त्यांना योग्य सन्मान मिळेल.”, असे केसरकरांनी यावेळी सांगितले. केसकरांच्या या वक्तव्यानंतर पंकजा यांना भविष्यात राज्य सरकारच्या मंत्रिमंडळात योग्य संधी दिली जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
महत्वाच्या बातम्या:
- Kishori Pednekar | उद्धव ठाकरे यांच्या बैठकीनंतर किशोरी पेडणेकर यांची प्रतिक्रिया!
- Deepak Kesarkar | बाळासाहेबांचे विचार जे जपतात ती खरी ‘शिवसेना’- दीपक केसरकर
- BJP । उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्रातील जनतेच्या पाठीत खंजीर खूपसला; भाजपच्या ‘या’ केंद्रीय मंत्र्याचा हल्लाबोल
- BJP vs Amol Mitkari | “अमोल मिटकरी राजकारणातले थिल्लरपणा” ; भाजप प्रवक्त्याची खोचक टीका
- Uddhav Thackeray | 2019 च्या निवडणुकांमध्येच भाजपची भूमिका लक्षात आली होती- उद्धव ठाकरे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
