🕒 1 min read
पुणे : राज्यात सुरु असलेले आरोप प्रत्यारोपांचे सामने अजूनही थांबायचं नाव घेत नाहीत. कधी महाविकास आघाडी विरुद्ध शिंदे गट, कधी भाजप आणि मनसे, तर कधी मूळ शिवसेना विरुद्ध शिंदे गट असे सामने रंगताना दिसून येत आहेत. त्यातच आता खरी शिवसेना आमचीच असल्याचा शिंदे गट दावा करत आहे. तर शिवसेना आणि शिवसेनेचं पक्ष चिन्ह नक्की कुणाचं हा वाद आता कोर्टात पोहचला आहे. दरम्यान सध्या दोन्ही गटांकडून एकमेकांवर तुफान टीका होत आहेत. अशीच टीका आज शिंदे गटाचे प्रवक्ते आणि कॅबिनेट मंत्री दीपक केसरकर यांनी माजी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर केली आहे.
केसरकरांनी आज पुण्यात संभाजीराजे भोसले यांची भेट घेतली. तेव्हा झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. “एक व्यक्ती आहे, जी महाराष्ट्रभर फिरत आहे. असभ्य भाषेत लोकांवर आरोप करत आहे. पण आपण सरकारचा भाग असताना पर्यटनाच्या माध्यमांतून आपण सरकारला काय दिलं, याची त्यांना अजून जाणीव नाही झाली. महाराष्ट्र रक्तात असावा लागतो. महाराष्ट्राचं प्रेम असं असावं लागतं कि, गोर गरिबांचं कल्याण करावं असं वाटायला हवं. वारसा हा फक्त रक्ताचा किंवा राजकीय असता कामा नये. कौतुकाचा, सभ्यतेचा, भाषेचा वारसा असला पाहिजे. आम्ही त्या मोठ्या लोकांबद्दल बोलूच शकत नाही. पण आम्ही काम करून दाखवू शकतो.”, अशी टीका केसरकरांनी आदित्य ठाकरेंवर केली आहे.
यावेळी संभाजीराजे भोसले यांनी दीपक केसरकर यांना पर्यटन खातं मिळावं अशी इच्छा व्यक्त केली आहे. तसेच यावेळी मराठा आरक्षणाचा मुद्दा देखील पुन्हा उपस्थित करण्यात आला. त्यावर बोलताना केसरकर म्हणाले कि, “मराठा समाजाला न्याय मिळाला तर त्या समाजातील मुलांना पुढे जाऊन चांगले शिक्षण आणि नोकऱ्या मिळतील. त्यामुळे संभाजीराजेंची लढाई काही स्वतःसाठी नाही. त्यांच्या पूर्वजानीही अनेक लढाया केल्या. पण त्या तलवारीने लढल्या गेल्या. परंतु हि लढाई आपल्याला बुद्धीच्या जोरावर लढायची आहे.”
महत्वाच्या बातम्या:
- Kishori Pednekar | उद्धव ठाकरे यांच्या बैठकीनंतर किशोरी पेडणेकर यांची प्रतिक्रिया!
- Deepak Kesarkar | बाळासाहेबांचे विचार जे जपतात ती खरी ‘शिवसेना’- दीपक केसरकर
- BJP । उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्रातील जनतेच्या पाठीत खंजीर खूपसला; भाजपच्या ‘या’ केंद्रीय मंत्र्याचा हल्लाबोल
- BJP vs Amol Mitkari | “अमोल मिटकरी राजकारणातले थिल्लरपणा” ; भाजप प्रवक्त्याची खोचक टीका
- Uddhav Thackeray | 2019 च्या निवडणुकांमध्येच भाजपची भूमिका लक्षात आली होती- उद्धव ठाकरे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

