🕒 1 min read
पुणे : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्यावर अश्लील टिप्पणी करणाऱ्या तरुणाला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. अमित वायकर असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. याला पुण्याच्या आळेफाटा पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी भाजप नेत्या आशाताई बुचके यांनी अमित वायकर नावाच्या तरुणाविरोधात आळेफाटा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, अमित वायकर हा मोबाईलवर फेसबुकवर पोस्ट पाहत होता. यावेळी ठाण्यातील शिवसेना आमच्यासोबत आहे, या मथळ्यात लिहिलेल्या एका बातमीवर त्याची नजर गेली. बातमी वाचून त्यांनी उपमुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल करत कमेंट बॉक्सवर अश्लील टिप्पणी केली. ही टिप्पणी त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याबद्दल होती आणि या टिप्पणीची भाषा अत्यंत अश्लील होती.
तरुणाविरुद्ध तक्रार दाखल-
पुणे येथील रहिवासी अमित वायकर यांची ही टिप्पणी सोशल मीडियावर व्हायरल झाली. देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नीबद्दल केलेल्या अश्लील वक्तव्यामुळे खळबळ उडाली होती. यानंतर जुन्नरच्या भाजप नेत्या आशाताई बुचके यांनी यावर कारवाई करत थेट पुण्याच्या आळेफाटा पोलिसात संबंधित तरुणाविरुद्ध तक्रार दाखल केली. पोलिसांनीही तात्काळ कारवाई करत अमित वायकर याला ताब्यात घेऊन चौकशीनंतर अटक केली.
महत्वाच्या बातम्या :
- Sudhir Mungantiwar | ‘शिंदे गट’ न म्हणता ‘शिवसेना’ म्हणा – सुधीर मुनगंटीवार
- Deepak Kesarkar | रक्ताचा वारसा केवळ राजकीय असता कामा नये ; केसरकरांचा आदित्य ठाकरेंना टोला
- Kishori Pednekar | उद्धव ठाकरे यांच्या बैठकीनंतर किशोरी पेडणेकर यांची प्रतिक्रिया!
- Deepak Kesarkar | बाळासाहेबांचे विचार जे जपतात ती खरी ‘शिवसेना’- दीपक केसरकर
- BJP । उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्रातील जनतेच्या पाठीत खंजीर खूपसला; भाजपच्या ‘या’ केंद्रीय मंत्र्याचा हल्लाबोल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
