Share

Ambadas danve | गद्दारांना धडा शिकवण्यासाठी मविआने एकत्र येण्याची गरज – अंबादास दानवे

Published On: 

🕒 1 min read

नांदेड : राज्यात गेल्या काही दिवसांपासून तुफान अतिवृष्टी होत आहे. बऱ्याच भागांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. तर शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याच पार्श्वभूमीवर आज विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे नांदेड दौऱ्यावरती आले आहेत. त्यावेळी त्यांनी पासदगाव, पिंपळगाव येथे जाऊन अतिवृष्टी झालेल्या आणि नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन शिंदे-फडणवीस सरकारने शेतकऱ्यांना दिलेल्या अनुदानाविषयी भाष्य केले. त्याचबरोबर एकनाथ शिंदे गटावर देखील निशाणा साधला.

अंबादास दानवे म्हणाले कि, “या सरकारने शेतकऱ्याची थट्टा केली आहे. ठाकरे सरकारने नुकसानग्रस्त भागातील सगळ्या शेतीचे पंचनामे करून ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे, त्यांना योग्य मदत केली. काही शेतकऱ्यांना एक लाख तर काहींना पन्नास हजार रुपये मदत म्हणून जाहीर केले होते. पण या सरकारने तसे केले नाही. सरकारने शेतकऱ्यांना जी मदत दिली आहे ती पुरेशी नसून याविरोधात आम्ही आवाज उठवणार आहोत. विरोधी पक्षनेते म्हणुन आम्ही आमची भुमिका पार पाडू. कुठेही अन्याय झाला, अत्याचार झाला की शिवसैनिक पेटुन उठतो. शिवसेनेला दाबण्याचा प्रयत्न केला तर शिवसेना उसळुन समोरच्याचा नाश केल्याशिवाय राहणार नाही.”, असा इशारा त्यांनी यावेळी दिला आहे.

तसेच पुढे बोलताना ते असेही म्हणाले कि, “या मंत्रिमंडळामध्ये एकाही महिलेला स्थान न दिल्यामुळे हा महिलांचा अपमान आहे. तसेच शिवसेनेला सोडुन गेलेले जे गद्दार आहेत. ज्यांनी गद्दारांचे सरकार बनवले आहे, त्यांना धडा शिकवण्यासाठी महाविकास आघाडीने एकत्रित शक्ती लावण्याची आवश्यकता आहे.”

केसरकरांनी मांडली शिंदे गटाची बाजू

“आमची बाजू खूपच लंगडी आहे असं समजू नका. आम्ही कोर्टाचा मान राखत आहोत त्यामुळे आम्ही आमची बाजू फक्त कोर्टाचं मांडत आहोत. पण आमचे विरोधक मात्र वेगवेगळ्या वकिलांना घटनातज्ञ म्हणून मीडियासमोर आणतात आणि शिंदे गट कसा दोषी आहे, हे त्या वकिलांमार्फत सांगितलं जात आहे. पण खरं तर आमच्या बाजूने बहुमत असल्यामुळे आम्हीच मूळ शिवसेना आहोत. हीच आमची ठाम भूमिका आहे. आम्ही कोर्टाचा मान राख असल्याने आम्ही याबाबतीत कोणत्याही मीडिया ट्रायल घेतलेल्या नाहीत. शिवसेना बाळासाहेबांनी स्थापन केली आणि त्यामुळे बाळासाहेबांचे विचार जे जपतात तेच खरी शिवसेना आहेत. म्हणजेच आम्हीच खरी शिवसेना आहोत.”, असे मत दीपक केसरकर यांनी व्यक्त केले.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!