🕒 1 min read
नाशिक : सध्या राज्यभर युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची निष्ठा यात्रा सुरु आहे. ते आज नाशिक दौऱ्यावर आले आहेत. यावेळी सुहास कांदे यांचं आव्हान आदित्य ठाकरे यांनी स्वीकारलं आहे. मी त्यांना निश्चित भेटेन. ते मातोश्रीवरही भेटायला आले तरी चालेल, दरवाजे उघडेच आहेत.
मी काळाराम मंदिरात नेहमीच येतो. आताही दर्शनासाठी आलो. आता आपण मंदिरात आहोत. त्यामुळे इथे राजकारण नको, असं आदित्य ठाकरे म्हणाले. यानंतर आदित्य ठाकरे मनमाडला आले. यावेळी मनमाड मेळाव्यात बोलताना त्यांनी बंडखोरांवर जोरदार टीका केली. यावेळी बोलताना आदित्य ठाकरे यांनी ही कांदे यांच्यावर पलटवार केला आहे. मी गद्दारांना उत्तर देणार नाही. त्यांना मी बांधिल नाही. मी उत्तरं द्यावीत एवढी गद्दारांची लायकीही नाही, गद्दारी का केली? ही लोकांची भावना आहे. गद्दारांनी ते पाहावी, अशा शब्दात आदित्य ठाकरे यांनी सुहास कांदे यांना फटकारले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- Suhas Kande : आदित्य ठाकरे वाघ, पण मटण खायच्याऐवजी डाळ भात खाताहेत; सुहास कांदे यांचा पलटवार
- IND vs WI ODI : टीम इंडियाला मोठा झटका, स्टार खेळाडू जखमी; मालिकेबाहेर जाऊ शकतो
- Webseries | ‘मी पुन्हा येईन‘ चा ट्रेलर लाँच; दमदार डायलॉग आणि जबरदस्त अभिनयाची पर्वणी
- Gulabrao Patil : “आधीच दौरे केले असते तर आज ही वेळ आली नसती”; गुलाबराव पाटलांचा आदित्य ठाकरेंना टोला
- IND vs WI 1st ODI : टीम इंडियाचे ‘हे’ ११ शिलेदार तयार..! एकहाती जिंकवून देऊ शकतात सामना
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
