Suhas Kande । नाशिक : सध्या राज्यभर युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची निष्ठा यात्रा सुरु आहे. ते आज नाशिक दौऱ्यावर आले आहेत. यावेळी बोलताना आदित्य ठाकरे यांनी ही कांदे यांच्यावर पलटवार केला आहे. मी गद्दारांना उत्तर देणार नाही. त्यांना मी बांधिल नाही. मी उत्तरं द्यावीत एवढी गद्दारांची लायकीही नाही, गद्दारी का केली? ही लोकांची भावना आहे. गद्दारांनी ते पाहावी, अशा शब्दात आदित्य ठाकरे यांनी सुहास कांदे यांना फटकारले आहे. मात्र आता सुहास कांदे यांनी देखील प्रत्युत्तर दिल आहे.
सुहास कांदे यांनी बोलताना म्हणाले कि, आदित्य ठाकरे वाघ आहेत, पण मटण खायच्याऐवजी डाळ भात खात आहेत. उद्धवसाहेब आमदार गेले पण तुमच्या आजू बाजूचे पोट भरणारे बडवे तिथेच आहेत, असं म्हणत त्यांनी आदित्य यांना टोला लगावला आहे. शिवाय ठाकरेंच्या भेटी विषयी कांदेंनी आपली खंत बोलून दाखवली आहे. आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना 100 पत्र दिली. पण एकाही पत्राला उत्तर नाही म्हणून योजना रखडल्या. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले आणि दुसऱ्या दिवशी परवानगी मिळाली. माझ्या दुबईवरून आणलेल्या जाड चपला घासल्या गेल्या पण आदित्य ठाकरे काही भेटले नाहीत, असं कांदे म्हणालेत.
दरम्यान, दुसरीकडे दीपक केसरकर यांनी देखील आदित्य यांना प्रत्युत्तर दिल आहे. आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात सध्या महाराष्ट्रात शिवसंवाद यात्रा सुरु आहेत. शिवसैनिकांना ठाकरेंद्वारे मार्गदर्शन केलं जात आहे. मात्र या वेळी आदित्य ठाकरे एकनाथ शिंदे गटातील नेत्यांवर आरोप, अपमान करत आहेत. अशा प्रकारे नेत्यांना अपमानित करून जनतेची दिशाभूल करू नका. बाळासाहेब एकवचनी होते. शिंदेंना मुख्यमंत्रीपदाचं वचन दिलं गेलं होतं ही वस्तुस्थिती आहे. हे पद दिलं नाही. शिंदेसाहेब शांत राहिले, असं ते म्हणाले.
महत्वाच्या बातम्या :
- IND vs WI ODI : टीम इंडियाला मोठा झटका, स्टार खेळाडू जखमी; मालिकेबाहेर जाऊ शकतो
- Webseries | ‘मी पुन्हा येईन‘ चा ट्रेलर लाँच; दमदार डायलॉग आणि जबरदस्त अभिनयाची पर्वणी
- Gulabrao Patil : “आधीच दौरे केले असते तर आज ही वेळ आली नसती”; गुलाबराव पाटलांचा आदित्य ठाकरेंना टोला
- IND vs WI 1st ODI : टीम इंडियाचे ‘हे’ ११ शिलेदार तयार..! एकहाती जिंकवून देऊ शकतात सामना
- Gulabrao Patil : आम्ही शिवसेना सोडलेली नाही, आम्ही खरे शिवसैनिक आहोत – गुलाबराव पाटील
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

