🕒 1 min read
नवी दिल्ली : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील 3 सामन्यांच्या मालिकेतील पहिला एकदिवसीय सामना आज (शुक्रवार) पोर्ट ऑफ स्पेन येथे खेळवला जाणार आहे. रोहित शर्मा, विराट कोहली आणि ऋषभ पंत या खेळाडूंच्या अनुपस्थितीत भारतीय संघ ही मालिका खेळणार आहे. संघाची कमानही शिखर धवनच्या खांद्यावर असेल. अशा परिस्थितीत युवा खेळाडूंना स्वत:ला सिद्ध करण्याची चांगली संधी असेल. मात्र, पहिल्या वनडेआधीच टीम इंडियाला मोठा झटका बसला आहे. संघाचा स्टार अष्टपैलू रवींद्र जडेजा जखमी झाला आहे. जडेजाला वनडे मालिकेसाठी संघाचा उपकर्णधार बनवण्यात आले आहे. पण, तो जखमी झाला आहे. यामुळे तो संघाच्या इनडोअर सराव सत्रातही सहभागी झाला नाही.
जडेजाची दुखापत किती गंभीर आहे हे अद्याप कळू शकलेले नाही, पण ज्या पद्धतीने तो सराव सत्रात सहभागी झाला नाही, त्यामुळे पहिल्या एकदिवसीय सामन्यात तो खेळण्याची शक्यता कमी दिसत आहे. यावर शिखर धवननेही वक्तव्य केले आहे. सामन्यापूर्वीच्या पत्रकार परिषदेत धवनने जडेजाच्या दुखापतीबाबत माहिती दिली. त्याने सांगितले की, भारतीय अष्टपैलू खेळाडूच्या गुडघ्याला दुखापत झाली आहे आणि त्याच्या दुखापतीबाबत बीसीसीआयचे वैद्यकीय पथक तपासणी करत आहे.
बीसीसीआय टी-20 विश्वचषक पाहता धोका पत्करू इच्छित नाही, त्यामुळे जडेजाला संपूर्ण एकदिवसीय मालिकेतून विश्रांती दिली जाऊ शकते. जेणेकरून त्याच्या डाव्या गुडघ्याची दुखापत आणखी वाढू नये. संपूर्ण एकदिवसीय मालिकेसाठी जडेजाला विश्रांती दिल्यास तो 29 जुलैपासून वेस्ट इंडिजविरुद्धच्या पाच टी-20 मालिकेसाठी तंदुरुस्त होऊ शकतो, असे क्रिकबझने म्हटले आहे.
टीम इंडियाचा उपकर्णधार कोण होणार?
जडेजाच्या दुखापतीमुळे भारतीय संघ व्यवस्थापनासमोरही पेच निर्माण झाला आहे. त्याला वनडे मालिकेसाठी उपकर्णधार बनवण्यात आले आहे. अशा परिस्थितीत जडेजा एकदिवसीय मालिकेतून बाहेर पडला तर त्याच्या जागी नवीन उपकर्णधाराची निवड करावी लागेल. मात्र, बीसीसीआय हा निर्णय प्रशिक्षक राहुल द्रविडवर सोडू शकते. संघात युझवेंद्र चहल आणि शार्दुल ठाकूरसारखे वरिष्ठ खेळाडू आहेत.
महत्वाच्या बातम्या :
- Gulabrao Patil : “आधीच दौरे केले असते तर आज ही वेळ आली नसती”; गुलाबराव पाटलांचा आदित्य ठाकरेंना टोला
- IND vs WI 1st ODI : टीम इंडियाचे ‘हे’ ११ शिलेदार तयार..! एकहाती जिंकवून देऊ शकतात सामना
- Gulabrao Patil : आम्ही शिवसेना सोडलेली नाही, आम्ही खरे शिवसैनिक आहोत – गुलाबराव पाटील
- uday samant : आम्हाला गद्दार म्हणण्याचा कोणाला अधिकार नाही – उदय सामंत
- Monsoon special | पावसाळ्यात चहाबरोबर ‘हे’ पदार्थ खाण्याची मजा काही औरच; वाचा रेसिपी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
