Share

Webseries | ‘मी पुन्हा येईन‘ चा ट्रेलर लाँच; दमदार डायलॉग आणि जबरदस्त अभिनयाची पर्वणी

Published On: 

🕒 1 min read

महाराष्ट्र देशा डेस्क : राज्यातील सत्तानाट्य संपूर्ण महाराष्ट्राने अनुभवलं आहे. यातच आता ‘मी पुन्हा येईन‘ हा डायलॉग पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. कारण आहे एका जबरदस्त वेबसिरीजचं. ‘रानबाजार’ आणि ‘अनुराधा’ या वेबसिरीजच्या घवघवीत यशानंतर ‘प्लॅनेट मराठी’ घेऊन येत आहे एक नवी वेबसिरीज. काल्पनिक राजकीय कथेवर आधारित ‘मी पुन्हा येईन’ ही वेबसिरीज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘खुर्ची’साठी सुरु असलेला सत्तासंघर्ष या वेबसिरीजमध्ये पाहायला मिळणार आहे. नुकताच या वेबसिरीजचा ट्रेलर लाँच झाला आहे.

सुप्रसिद्ध लेखक अरविंद जगताप यांनी ही वेबसिरीज लिहिली असून या वेबसिरीजच्या माध्यमातून त्यांनी पहिल्यांदाच दिग्दर्शन देखील केले आहे. या वेबसिरीजचा ट्रेलर नुकताच प्लॅनेट मराठीच्या सोशल मीडिया हॅण्डलवरून शेयर करण्यात आला आहे. या ट्रेलरमध्ये पाहायला मिळणारे सिन हे काही दिवसांपूर्वी राज्यात चालू असलेल्या घडामोडींशी काही प्रमाणात मिळते जुळते वाटतात. पण वेबसिरीजची जमेची बाजू आहे ती म्हणजे डायलॉग. दमदार डायलॉग आणि सत्यच वाटावा असा अभिनय ही या वेबसिरीजची सर्वात जास्त जमेची बाजू आहे. जी नेटकऱ्यांच्याही पसंतीस पडली आहे. या ट्रेलरवर नेटकऱ्यांनी तुफान कंमेंट्स केल्या आहेत. २९ जुलैला ही बहुप्रतीक्षित वेबसिरीज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे

https://www.instagram.com/p/CgThYXasPmP/?utm_source=ig_web_copy_link

या वेबसिरीजमध्ये सयाजी शिंदे, उपेंद्र लिमये, भारत गणेशपुरे, सिद्धार्थ जाधव, प्रभाकर मोरे, अमित तडवळकर, रमेश वाणी, संजय कुलकर्णी, राजेश दुर्गे, राजेंद्र गुप्ता, रुचिका जाधव, दिप्ती क्षीरसागर आणि सीमा कुलकर्णी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!